विद्यार्थी रमले पक्ष्यांच्या दुनियेत, दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन ठाण्यात संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 01:38 PM2018-12-11T13:38:18+5:302018-12-11T13:40:03+5:30
दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन ठाण्यात संपन्न झाले यात शहरातील विविध शाळा सहभागी झाल्या होत्या.
ठाणे : पर्यावरण दक्षता मंडळ , होप , जिज्ञासा, फर्न आणि यु बी जी सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे ठाणे विद्यार्थी पक्षीमित्र संमेलन ठाण्याच्या डॉ. बेडेकर विद्यामंदिर येथे संपन्न झाले. या पक्षीमित्र संमेलनात ठाण्याच्या विविध शाळांमधून ५६ विद्यार्थी सहभागी झाले होते.
या संमेलनाच्या निम्मिताने विद्यार्थ्यांसाठी पक्षी बना , चित्रकला आणि पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या कार्यक्रमासाठी डॉ. राजू कसंबे (BNHS) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉ. राजू कसंबे यांनी विद्यार्थ्यांना पक्षांविषयी माहिती, त्यांचे संवर्धन कसे करावे, त्यांचे परिसंस्थेतील स्थान अश्या अमूल्य विषयांचे मार्गदर्शन केले तसेच पक्षी तज्ञ म्हणून करिअर विषयी मार्गदर्शन केले आणि त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पौर्णिमा शिरगावकर यांनी केले असून कार्यक्रमासाठी ठाण्यातील शिव समर्थ विद्यालय, नवोदय विद्यालय, मो. ह. विद्यालय बेडेकर विद्यालय, सरस्वती शाळा या शाळांनी आपला सहभाग दर्शवला होता. पीपीटी स्पर्धेत नवोदय इंग्रजी माध्यम शाळेतील क्रीना ठक्कर व सुजनान आचार्य यांनी प्रथम, डीएव्ही पब्लिक स्कुलच्या अत्री मुखर्जी, किर्तना प्रकाश यांनी द्वितीय तर शिव समर्थ विद्यालयाचे मोक्ष जाधव आणि प्रतिक हुरसाळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. पक्षी बना या स्पर्धेत मो. ह. विद्यालयाची सौम्या गोवेकर (कावळा) प्रथम, नवोदय इंग्रजी माध्यमाची करिना ठक्कर (ब्राह्मणी घार)हिने द्वितीय तर, श्रीरंग विद्यालय इंग्रजी माध्यमाचा तनय आचार्य याने (माळढोक) तृतीय क्रमांक पटकावला. तसेच, चित्रकला स्पर्धेत सरस्वती सेकंडरी स्कूलची स्वरांगी धारप प्रथम, डॉ. बेडेकर विद्या मंदिरचा समर्थ पाटील द्वितीय तर नवोदय इंग्रजी माध्यमाची स्नेहा घोष हिने तृतीय क्रमांक पटकावला.