जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन : आठ महिन्यांत रुग्णालयाने वाचवले २९ जणांचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 12:10 AM2019-09-10T00:10:32+5:302019-09-10T00:10:48+5:30

मानसोपचारतज्ज्ञ नसल्याने शासकीय रुग्णालयाच्या अडचणींत वाढ

World Suicide Prevention Day: | जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन : आठ महिन्यांत रुग्णालयाने वाचवले २९ जणांचे प्राण

जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन : आठ महिन्यांत रुग्णालयाने वाचवले २९ जणांचे प्राण

Next

ठाणे : दिवसेंदिवस बदलती जीवनशैली, वाढता मानसिक ताणतणाव तसेच घरगुती छोट्यामोठ्या कारणांतून आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जातो. अशा प्रकारे मागील आठ महिन्यांत ठाणे जिल्हा (सामान्य) शासकीय रुग्णालयात आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर उपचारार्थ दाखल झालेल्या २९ जणांचे प्राण वाचविण्यात जिल्हा रुग्णालय प्रशासनाला यश आले आहे. मात्र, त्यांचे समुपदेशन करून त्यांना जीवन जगण्याचा नवीन मार्ग दाखवणारे मानसोपचारतज्ज्ञ नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच, रुग्णालय प्रशासनाने मानसोपचारतज्ज्ञांबाबत जाहिरात दिली असून लवकरच ते मिळतील, असे सांगितले जात आहे.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या घटनांमध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे शासकीय आकडेवारीवरून पुढे आले आहे. तसेच मागील चार वर्षांत आत्महत्येचा प्रयत्न करणाºया ४५६ जणांचे प्राण वाचवल्याची बाब जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली आहे.

ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांकडून रु ग्णांसोबत जिव्हाळ्याचे नाते जपले जात आहे. त्यातच सध्याची बदलती जीवनशैली, स्पर्धात्मक युग यामध्ये प्रत्येकाचे जीवन एका माशाप्रमाणे जणू अडकत चालले आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून होणारा अपमान, प्रेमभंग यासारखे प्रकार किंवा एखादी मनासारखी गोष्ट न मिळणे या आणि काही गोष्टींमुळे माणूस हा मानसिक ताणतणावाखाली जगताना दिसतो. त्यातून तो आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतो. त्यासाठी विषारी द्रव्य प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न करतो. अशा प्रकारे आत्महत्येचा प्रयत्न केलेले रु ग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाल्यावर त्यांच्यावर उपचार करून त्यांचे प्राण वाचवण्यात येते. एवढेच नाहीतर रुग्णालयात आलेल्या अशा रु ग्णांवर मानसोपचारतज्ज्ञ मंडळींमार्फत जानेवारी २०१९ पर्यंत समुदेशन केले जात होते. मात्र, त्या मानसोपचारतज्ज्ञांनी राजीनामा दिला. त्यानंतर, रुग्णालयात येणाºया रुग्णाला ठाणे जिल्हा मेंटल रुग्णालयातील मानसोपचारतज्ज्ञ बोलवून त्यांचे समुपदेशन केले जाते. दरम्यान, रुग्णालयातील समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय व मनोविकृती) श्रीरंग सिद हे तज्ज्ञ डॉक्टरांना मदत करून अशा रु ग्णांना आशेचा नवीन किरण दाखविण्याचे मोलाचे काम करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

रुग्णालयात सध्या मानसोपचारतज्ज्ञ नसल्याच्या गोष्टीला दुजोरा देताना, ती जागा भरण्यासाठी जाहिरात दिली आहे. त्यानुसार, येत्या काही दिवसांत ती जागा भरली जाईल. तसेच मीरा-भाईंदर येथील रुग्णालयातून आणखी एक मानसोपचारतज्ज्ञ जिल्हा रुग्णालयाला मिळणार आहे. - डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे जिल्हा रुग्णालय

Web Title: World Suicide Prevention Day:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.