जागतिक व्यापारी नाविक दलाची भिस्त फक्त 15 लाख नाविकांवर आहे : पीटर रासमुसन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 04:24 PM2018-07-16T16:24:25+5:302018-07-16T16:27:07+5:30
एमा सभागृहात एमाच्या डी एन एस बॅच १६ ची पासिंग आऊट परेड (पी ओ पी ) व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.
ठाणे : खांडपे, कर्जत येथील अँग्लो ईस्टर्न मेरीटाईम अकादमी (एमा ) आज डी एन एस बॅच १६ ची पासिंग आऊट परेड माझ्या उपस्थितीत साजरी होत असताना पाहून मी आनंदित झालो आहे. आम्हाला तुम्ही हवे आहात. तुम्ही भारताचे राजदूत आहात.बोटीवर कार्यरत असताना तुमचे वरिष्ठ अधिकारी हेच तुमचे प्रेरणास्रोत असतील.त्यांचा सल्ला घ्या. आज सुमारे १५ लाख नाविकांवर जागतिक व्यापारी नाविक दलाची भिस्त आहे, हि बाब आपणासर्वांसाठी गौरवास्पद आहे, असे मनोगत बिमकोचे हेड ऑफ मेरीटाईम इन्फॉरमेशन माननीय पीटर रासमुसन यांनी व्यक्त केले.
एमा सभागृहात एमाच्या डी एन एस बॅच १६ ची पासिंग आऊट परेड (पी ओ पी ) व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला.त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कॅडेट्सना मार्गदर्शन करताना पीटर रासमुसन बोलत होते. सन्माननीय पाहुणे म्हणून या प्रसंगी बोलताना अँग्लो ईस्टर्न शिप मॅनेजमेन्ट , हाँग काँगचे बिझिनेस डेव्हलपमेंट डायरेक्टर (कमर्शिअल ) माननीय कॅप्टन अनिल तेजपाल म्हणाले कि नऊ वर्षांपूर्वी खांडपे,कर्जत येथे एमाची स्थापना करण्यांत कॅप्टन प्रदीप चावला यांचा सिंहाचा वाटा आहे.भविष्यात एमाचा कॅडेट कॅप्टन नक्की होणार.आज जगातील ९० टक्के माल वाहतूक ही व्यापारी नाविक दलाच्या बोटीतुन होत असते.तेंव्हा भविष्यात तुम्ही कुशल मरिनर व्हा, असा आशीर्वाद त्यांनी कॅडेट्सना दिला.गतवर्षी सेकंड मेट्स परीक्षेत एमाच्या विकी झा याने ११०० पैकी ९२७ (८३.७२ %) गुण संपादन करून भारतात प्रथम क्रमांक पटकावला . त्या बद्दल त्याचा डीन कॅप्टन जयराज नाखवा यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यांत आला. तसेच आशिष चंडल याचा बेस्ट ऑल राऊंड कॅडेट म्हणून गौरव करण्यांत आला.प्राचार्य कॅप्टन सुरीन नारंग यांनी स्वागत केले,डीन कॅप्टन जयराज नाखवा यांनी अहवाल वाचन केले. कॅप्टन महेश सुब्रह्मण्यम यांनीप्रास्ताविक केले. कॅप्टन कृष्णा फाटक यांनी पारितोषिक विजेत्यांची नावे जाहीर केली. समारंभाचे श्वेता सिंग हिने सूत्रसंचालन केले तर कॅडेट गगनदीप सिंग याने आभार मानले. स्थानिक समाजसेवक सुधाकर घारे,ठाण्याच्या श्री आनंद भारती समाज संस्थेचे कार्याध्यक्ष हरेश्वर मोरेकर,बळवंत सकपाळ, भारती मोरेकर आदी मान्यवर उपस्थित होते.