दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात ज्यू नेत्यांकडून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 12:13 AM2019-06-11T00:13:34+5:302019-06-11T00:14:04+5:30
पराग वैद्य यांची माहिती : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे डोंबिवलीत संवाद
डोंबिवली : चर्चिल, रूझवेल्ट आणि स्टालिन हे सर्व नेते ज्यू होते. दुसºया महायुद्धाची सुरुवात १ सप्टेंबर १९३९ ला नव्हे, तर ३० जानेवारी १९३३ ला झाली. हिटलर साम्राज्य विस्तारवादी नव्हता. तर, ज्या राष्ट्रांशी त्याचे युद्ध झाले, त्या सर्व राष्ट्रांनी कैकपटीने साम्राज्य वाढवले होते. हिटलरला युद्ध करण्यास भाग पाडले. दुसरे महायुद्ध हे हिटलरने नव्हे, तर आम्ही सुरू केल्याचा अनेक ज्यू नेत्यांचा दावा आहे, असे मत लेखक पराग वैद्य यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषद, डोंबिवली शाखा यांच्यातर्फे ‘अडॉल्फ हिटलर : दुसरे महायुद्ध सत्य आणि विपर्यास’ या ग्रंथाचे लेखक पराग वैद्य यांच्याशी संवाद हा कार्यक्रम शनिवारी गणेश मंदिर संस्थानातील सभागृहात झाला. यावेळी वैद्य बोलत होते. अनेक प्रचलित समजुतींना धक्का देणारी विधाने या पुस्तकात असल्याचे वैद्य यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर ज्येष्ठ साहित्यिक वामनराव देशपांडे, प्रा. श्याम सायनेकर, सुरेश देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
वैद्य म्हणाले, युरोपातील राजकीय, आर्थिक क्षेत्रांवर ज्यूंचा प्रचंड प्रभाव होता. जर्मनीतील ८० टक्क्यांहून अधिक शेअर मार्केट आणि ९० टक्क्यांहून अधिक बँका या ज्यूंच्या अधिपत्याखाली होत्या. युद्ध सुरू होण्यापूर्वी पोलंडने २० हजार जर्मन लोकांचे शिरकाण केले होते. आजपर्यंत हिटलरचे चित्र काळ्या रंगातच रंगवले गेले आहे. त्याला दुसरी बाजूही आहे. हे पुस्तक लिहिण्यापूर्वी अनेक पुस्तकांचा अभ्यास केला असून त्यातील प्रत्येक विधानाला पुरावा आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश देशपांडे यांनी केले. वृंदा कौजलगीकर यांनी सूत्रसंचालन केले.
भूगोलामुळे युद्ध होते
प्रा. श्याम सायनेकर म्हणाले, भूगोलामुळे युद्ध होते आणि इतिहासामुळे भूगोल बदलतो. प्रशासनात अधिकारशाही असली की, प्रशासनाला शिस्त लागते. तसेच जर्मनीच्या रक्तात लष्करी वृत्ती भिनली आहे. त्या वृत्तीचे आकर्षण आणि शिस्त हे जर्मनीचे प्राण आहेत. लष्करी वृत्तीमुळे शिस्त, देशभक्ती निर्माण होते, असे सांगितले.