ठाणेकरांनी पाहिली १२८७ सालातील जगातील सगळ्यात पहिली नोट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 12:10 AM2019-01-21T00:10:20+5:302019-01-21T00:10:28+5:30

दोन क्वॉन एवढी मूल्य असलेली मलबरी पेपरवर बनवलेली चायनामधील १२८७ सालातील जगातील सगळ्यात पहिली नोट पहिल्यांदाच ठाणेकरांना पाहायला मिळाली.

The world's first note in the year 1287 observed by Thanekar | ठाणेकरांनी पाहिली १२८७ सालातील जगातील सगळ्यात पहिली नोट

ठाणेकरांनी पाहिली १२८७ सालातील जगातील सगळ्यात पहिली नोट

Next

ठाणे : दोन क्वॉन एवढी मूल्य असलेली मलबरी पेपरवर बनवलेली चायनामधील १२८७ सालातील जगातील सगळ्यात पहिली नोट पहिल्यांदाच ठाणेकरांना पाहायला मिळाली. निमित्त होते द हॉबी क्लबद्वारे भरवण्यात आलेल्या दुर्मीळ वस्तूंच्या प्रदर्शनाचे. विशेष म्हणजे यात मलेशियातील जगातील सर्वात मोठ्या आकाराची (६०० रिंगीट) आणि जगातील सर्वात कमी चलनी मूल्य असलेली, फिजी बेट येथील एक सेंटची नोटदेखील पाहण्याची संधी छंदप्रेमींना मिळाली.
टाउन हॉल येथे आयोजित केलेल्या दोनदिवसीय प्रदर्शनात अनेकविध छंदवस्तू ठाणेकरांना पाहता आल्या. अभय फाटक यांनी आपल्या आठवणी यावेळी उलगडल्या. त्यांच्या छंदात जगभरातील बॅग्जचे दुर्मीळ टॅग्स, जगभरातील तीन हजार पाण्याच्या बाटल्यांचे लेबल्स, प्रेक्षणीय स्थळांचे तिकीट, विमानातील, रेस्टॉरंटमधील टूथपिक अशा विविध वस्तू, अनिष मेहता यांनी केलेल्या बँकेच्या नोटांचे कलेक्शन त्यात ज्या नोटांचे चलनमूल्य ५० हजारांहून अधिक आहे, अशा नोटा त्यांनी जमवलेल्यांचे पाहायला मिळाले. यात हंगेरी देशातील पेंगो, ज्या नोटेवर १९ शून्य आहेत आणि ती चलनात आहे, तसेच २० शून्य असलेली आणि चलनात न आलेली नोट, डॉलर, नोटांच्या अनकट शीटही प्रदर्शनात मांडल्या होत्या. विनायक जोशी यांनी जमवलेले वेगवेगळ्या आकारांचे, धातूंचे जगभरातील ४०० ते ५०० बॉटल ओपनर्स प्रदर्शनात होते़
>द हॉबी क्लब : सतीश प्रभू यांच्या संग्रहातील हाडं, प्लास्टिक, आंब्याची कोय, पोफळीची साल, मक्यापासून बनवलेले पर्यावरणपूरक चमचे, वेगवेगळ्या धातूंच्या, आकारांच्या पळ्या, प्रसन्न वव्हाळ यांच्या संग्रहातील इंग्लंडची राणी क्वीन एलिझाबेथ २ चे फोटो असलेल्या नोटा, नाणी, पोस्टाचे स्टॅम्प, पोस्टाची पाकिटे तसेच धर्मेश ठक्कर यांनी जमवलेले सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आणि बेटांच्या नोटा, मनीष टुराखिया यांच्या संग्रहातील भारतातील महापुरुषांच्या स्मरणार्थ काढलेले आणि चलनात नसलेले (यूएनसी) आणि प्रूफ कॉइन सेट येथे पाहायला मिळाले.
छंदिष्टांनी जगभरातून विकत घेतलेल्या तसेच मिळवलेल्या वस्तू लोकांसमोर याव्यात, जुन्या गोष्टींचे जतन करणे आणि नवीन गोष्टी मिळवणे, हे नवीन पिढीला कळावे, त्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूने ठाण्यात भरवलेले हे पहिले प्रदर्शन होते.
- अभय फाटक, संस्थापक अध्यक्ष, द हॉबी क्लब

Web Title: The world's first note in the year 1287 observed by Thanekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.