मुलाच्या मृत्यूचे ऐकून वाईट वाटले, पण येऊ शकत नाही!

By जितेंद्र कालेकर | Published: June 1, 2018 09:16 PM2018-06-01T21:16:24+5:302018-06-01T21:54:16+5:30

एखादा मुलगा वाम मार्गाला गेल्यानंतर त्याच्या मृत्युचाही चटका आई वडीलांना लागू नये. असा प्रकार ठाण्याच्या कासारवडवली पोलिसांना अनुभवास मिळाला.

Worried to hear the son's death, but can't come to funeral! | मुलाच्या मृत्यूचे ऐकून वाईट वाटले, पण येऊ शकत नाही!

मुलाच्या मृत्यूचे ऐकून वाईट वाटले, पण येऊ शकत नाही!

Next
ठळक मुद्देआत्महत्या करणाऱ्या मुलाच्या आईचे हताश उद्गारमुलाच्या खूनानंतर पित्याची आत्महत्याठाण्याचे कासारवडवली पोलीसही आवाक

जितेंद्र कालेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ‘मुलाच्या मृत्यूचे ऐकून वाईट वाटले, पण आम्हीच आता वृद्ध झालो आहोत, आम्ही तिकडे (ठाण्यात) येऊ शकत नाही, त्यामुळे काय तो तुम्हीच निर्णय घ्या,’ अशी हतबलता शोमीक घोष (३९) ची कोलकता येथे असलेली आई जयश्री बिजोय घोष यांनी कासारवडवली पोलिसांना फोनवरून व्यक्त केली. शोमीकने मुलाचा खून करून स्वत:ही आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी त्यांना दिल्यानंतर त्यांनी ही हतबलता व्यक्त केली.
लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर असलेल्या संगीत शिक्षक शोमीक यांने बुधवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास अचानक कासारवडवलीतील ‘विजय एनक्लेव’ येथील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी, त्याने पत्नी दिया आणि ठाणे पोलिसांच्या नावाने प्रत्येकी एक तर घर मालकाच्या नावाने दोन अशा चार वेगवेगळ्या चिठ्ठया लिहून ठेवल्या आहेत. त्याद्वारे शास्त्रीय नृत्यांगना असलेल्या आपल्या दुसºया पत्नीवर प्रचंड प्रेम असून तिही तीन महिन्यांपूर्वी सोडून गेल्याचा विरह सहन होत नाही. याच विरहातून आपण ही आत्महत्या करीत असल्याचे त्याने यात म्हटले आहे. दरम्यान, शोमीक आणि त्याचा मुलगा एकांक्ष (७) या दोघांच्या मृत्यूने कासारवडवली परिसरात एकच खळबळ उडाली. त्याची पत्नी दिया आणि कलकत्ता येथे राहणारे आईवडिल यांचा पोलिसांनी फोन मिळवून त्यांच्याशी बातचीत केली. तेंव्हा पत्नीने काहीशा नाराजीनेच पोलिसांना प्रतिसाद दिला. तर आईने फारसा खेद न व्यक्त करता, ‘ शोमीकच्या मृत्यूचे वाईट वाटले. पण आम्ही वृद्ध असल्यामुळे आम्ही तिकडे येऊ शकणार नाही. त्याबाबत काय तो अंतिम निर्णय पोलिसांनीच घ्यावा, तो आम्हाला मान्य असेल.’, असे त्या म्हणाल्या. तर त्याच्या मुलाच्याही मृत्यूची पोलिसांनी माहिती दिल्यानंतर जयश्री म्हणाल्या, आम्हाला त्याच्या लग्नाचीही माहिती नाही. २००० या वर्षापासून त्याचा आमचा काहीच संबंध नाही.’ असेही त्यांनी स्पष्ट केले. तर वडिलांनी काहीच प्रतिक्रीया व्यक्त केली नाही. मुळात, आता आत्महत्या केलेल्या या मुलाने त्याची पत्नी आणि मित्रांनाही आई वडीलांचा मृत्यु झाल्याचे भासविले होते. शिवाय, त्याच्या कर्जबाजारीपणाचा आणि खोटे बोलण्याच्या सवयीचा त्यांनाही त्रास झाला होता. शिवाय, त्याची प्रकृतीही खालावलेली असल्यामुळे त्यांनी मुलाच्या अंत्यविधी किंवा त्याचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी निरुत्साह दाखविला.
दरम्यान, त्याची पत्नी दिया हिला माहिती दिल्यानंतर तिने आता त्याचा मृतदेह ताब्यात घेण्याची तयारी दर्शविली आहे. उत्तरीय तपासणीची प्रक्रीया आणि इतर कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर पोलीस शोमीक आणि एकांक्ष या पिता पुत्राचे मृतदेह तिच्या ताब्यात देतील, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. याप्रकरणी सध्या तरी अकस्मिक मृत्यू अशी नोंद कासारवडवली पोलिसांनी केली आहे. परंतु, जिल्हा शासकीय रुग्णालयातून मुलाच्या शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच त्याच्या खुनाचाही गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: Worried to hear the son's death, but can't come to funeral!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.