चिंतामुक्त केंद्र सुरू करणार - मैत्रेय दादाश्रीजी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 09:56 AM2023-12-31T09:56:25+5:302023-12-31T09:56:43+5:30
आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करत असून, देशातील प्रत्येक राज्यात आणि विदेशातदेखील चिंतामुक्त केंद्र सुरू करणार आहे.
चिंताग्रस्त नागरिक अनेक वेळा आत्महत्येचे पाऊल उचलतात, आपण काय करणार आहात?
आत्महत्येचे प्रमाण जगामध्ये जास्त आहे. आध्यात्मिक व्यक्तींची जबाबदारी वाढते. आम्ही लोकांच्या कल्याणासाठी काम करत असून, देशातील प्रत्येक राज्यात आणि विदेशातदेखील चिंतामुक्त केंद्र सुरू करणार आहे.
चिंतामुक्त केंद्रात कशाप्रकारे उपचार केले जातील?
चिंतामुक्त केंद्र हे सर्वांसाठी खुले असणार असून, याठिकाणी येणाऱ्यांना त्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन तीन महिन्यांची ट्रीटमेंट दिली जाणार आहे. यामध्ये सायक्रेटिक्स, आध्यात्मिक, ध्यान साधना या माध्यमातून मानसिक आजार कमी करून स्वास्थ्य कसे चांगले करता येईल यासाठी प्रयत्न करणार आहोत.
समस्या वाढण्याची कारणे काय?
पूर्वीचा विचार करता सध्याचा काळ हा स्पर्धेचा आहे. यामुळे समस्या वाढल्या; केवळ औषधोपचार हाच उपाय आहे. मात्र, त्याला आध्यात्मिक जोड देणे आवश्यक आहे.
आपल्याशी समाजातील कोणते घटक जोडले आहेत?
आमचा संबंध समाजातील सर्व घटकांशी आहे. खेडेगावांमध्येदेखील आमचे खूप काम सुरू असून शहरी भाग, फिल्म इंडस्ट्री, राजकीय, सामाजिक असा प्रत्येक घटक जोडलेला आहे.
चिंतामुक्त भारतसाठी २०३२ का?
एखादा उपक्रम राबविताना थोडा वेळ लागतोच. २०३२ वर्ष आध्यात्मिकदृष्ट्या चांगली वेळ, चांगला काळ आणि परिवर्तनासाठी उत्तम वर्ष आहे. त्यामुळे हे वर्ष योग्य वाटत असून प्रयत्न सुरू केले आहेत.