वालधुनी नदीची सात रंगांच्या साड्यांनी पूजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:48+5:302021-07-10T04:27:48+5:30
अंबरनाथ : तालुक्यात उगम पावणाऱ्या वालधुनी नदीचे काकोळे ग्रामपंचायत आणि वालधुनी नदी बिरादरी यांच्यातर्फे सात रंगांच्या साड्यांनी पूजन करण्यात ...
अंबरनाथ : तालुक्यात उगम पावणाऱ्या वालधुनी नदीचे काकोळे ग्रामपंचायत आणि वालधुनी नदी बिरादरी यांच्यातर्फे सात रंगांच्या साड्यांनी पूजन करण्यात आले. अशा पद्धतीने पूजन करण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना आहे.
अंबरनाथ तालुक्यातील बोहोनोली गावाजवळ तावलीच्या डोंगरातून वालधुनी नदी उगम पावते. यानंतर ही नदी काकोळे धरण आणि तिथून अंबरनाथ शहरामार्गे उल्हासनगरमधून वाहत जाऊन खाडीला मिळते. या नदीची या वर्षी स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर यंदा वालधुनी नदी बिरादरी आणि काकोळे ग्रामपंचायतीतर्फे वालधुनी नदीची पूजा करण्यात आली. या वेळी पहिल्यांदाच सात रंगांच्या सात साड्यांनी नदीचे पूजन करण्यात आले. यानंतर या साड्या काकोळे गावातील नदी रक्षक भगिनींना भेट म्हणून देण्यात आल्या. अशा पद्धतीने अनोखे नदी पूजन करण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे. या नदी पूजनाच्या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ आणि वालधुनी नदी बिरादरीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
------