खासदार चषकात भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्यातील पैलवानांनी पटकावले ११ पदक   

By धीरज परब | Published: February 8, 2024 11:19 AM2024-02-08T11:19:28+5:302024-02-08T11:20:13+5:30

Mira Bhayander: डोंबिवलीच्या संत सावळाराम क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या " खासदार चषक कुस्ती स्पर्धा २०२४ " भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्याच्या पैलवानांनी ७ सुवर्ण व प्रत्येकी २ रौप्य आणि कांस्य अशी एकूण ११ पदके पटकावली. 

Wrestlers from Bhayander's Shriganesh Akhara bagged 11 medals in the MP Cup | खासदार चषकात भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्यातील पैलवानांनी पटकावले ११ पदक   

खासदार चषकात भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्यातील पैलवानांनी पटकावले ११ पदक   

मीरारोड - डोंबिवलीच्या संत सावळाराम क्रीडा संकुलात नुकत्याच पार पडलेल्या " खासदार चषक कुस्ती स्पर्धा २०२४ " भाईंदरच्या श्रीगणेश आखाड्याच्या पैलवानांनी ७ सुवर्ण व प्रत्येकी २ रौप्य आणि कांस्य अशी एकूण ११ पदके पटकावली. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने खासदार श्रीकांत शिंदे यांनी आयोजित केलेल्या ह्या कुस्ती स्पर्धेचा ६ फेब्रुवारी रोजी समारोप झाला . ह्या स्पर्धेत  मीरा भाईंदर कुस्तीगीर संघ संचालित श्री गणेश आखाड्यातील पैलवान सुद्धा सहभागी झाले होते. 

या कुस्ती स्पर्धेत प्रौढ गट मॅट विभागात पैलवान सूरज माने याने ७९ किलो वजनी गटात ; सूर्यकांत देसाई यांनी ८६ किलो वजनी गटात तर विशाल जाधव याने ९२ किलो वजनी गटात पहिला क्रमांक पटकावत सुवर्ण पदकचे मानकरी ठरले.

महिला गटात पैलवान कोमल पटेल हिने ४६ किलो वजनी गटात ; मनीषा शेलार हिने ५० किलो वजनी गटात ; डॉली  गुप्ता हिने ५६ किलो वजनी गटात व पैलवान कोमल देसाई हिने ६२ किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावली .  तर कविता राजभर हिने ४० किलो वजनी गटात व मनस्वी राऊत हिने ६२ किलो वजनी गटात  रोप्य पदक मिळवली.

कुस्तीच्या कुमार गट मध्ये पैलवान साहिल शिंदे  ह्याने ४० किलो वजनी गटात आणि ओम जाधव याने ८२ किलो वजनी गटात कांस्य पदक पटकावले .  कुस्ती स्पर्धेत तब्बल ७ सुवर्ण पदकांसह एकूण ११ पदकांची कमाई करून  यश संपादन सर्व पैलवानांचे अभिनंदन केले जात आहे . आखाड्याचे  संस्थापक पैलवान वसंतराव पाटील,  कुस्ती प्रशिक्षक वैभव माने व  कोमल देसाई यांचे मागदर्शन पैलवानांना लाभले .

Web Title: Wrestlers from Bhayander's Shriganesh Akhara bagged 11 medals in the MP Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.