यंदा ठाणे जिल्ह्यात आरटीईचे १० हजार प्रवेश रिक्त, केवळ सहा हजार जागांवर प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 06:49 PM2018-10-04T18:49:46+5:302018-10-04T19:01:40+5:30
दर्जेदार इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्या अंतर्गत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा ६४० शाळांमध्ये राखीव आहेत. त्यापैकी आतापर्यंतच्या चौथ्या फेरी अखेर सुमारे पाच हजार ७६४ जागांवर प्रवेश झाले. पाच व्या फेरीत १५९ विद्यार्थ्यांची निवड केजी ते पहिलीच्या प्रवेशासाठी झाली. हे प्रवेश पूर्ण झाले तरीही जिल्हह्यात केवळ पाच हजार ९२३ विद्यार्थ्यांचा प्रवेश होतील. यानंतरही जिल्ह्यात दहा हजार ६२३ आरटीई प्रवेशाच्या जागा यंदा रिक्त
ठाणे : दर्जेदार इंग्रजी शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये शिक्षणाचा हक्क (आरटीई) या कायद्या अंतर्गत २५ टक्के जागा आरक्षित ठेवल्या आहेत. यानुसार ठाणे जिल्ह्यात १६ हजार ५४६ जागा ६४० शाळांमध्ये राखीव आहेत. त्यापैकी आतापर्यंतच्या चौथ्या फेरी अखेर सुमारे पाच हजार ७६४ जागांवर प्रवेश झाले. पाच व्या फेरीत १५९ विद्यार्थ्यांची निवड केजी ते पहिलीच्या प्रवेशासाठी झाली. हे प्रवेश पूर्ण झाले तरीही जिल्हह्यात केवळ पाच हजार ९२३ विद्यार्थ्यांचा प्रवेश होतील. यानंतरही जिल्ह्यात दहा हजार ६२३ आरटीई प्रवेशाच्या जागा यंदा रिक्त राहत असल्याचे उघड झाले.
पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे प्रवेशासाठीची आता सहावी फेरी घेतली जाणार नसल्याचे शिक्षण विभागातून सांगितले जात आहे. या पाचव्या फेरीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची मुदत संपलेली आहे. तरी देखील पालकांनी त्वरीत संबंधीत शाळांमध्ये जावून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे आवाहन केले जात आहे. प्रवेशासाठी निवड झालेल्या १५९ विद्यार्थ्यांपैकी प्रायमरी केजीसाठी ३६ विद्यार्थी, ज्यू.केजीसाठी ११४, सिनिअर केजीसाठी तीन आणि पहिलीसाठी सहा विद्यार्थ्यांची निवड केली आहे. त्यांचे प्रवेश सध्या संबंधीत शाळांमध्ये घेतले जात आहे. यास अनुसरून पालकांनी त्वरीत संबंधीत शाळेत जावून बालकांचे प्रवेश घेण्याची अपेक्षा शिक्षणा विभागाव्दारे करण्यात आली आहे. पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या प्रवेश प्रक्रियेला आता थांबवण्याचे प्रयत्न सुरू आहे. यामुळे आता सहावी प्रवेश फेरी होणार नसल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्याभरात अजून ११ हजार ४७० जागा रिक्त असल्याचे दिसून येत आहेत. या प्रवेशास विलंब झाल्यामुळे पालकांचा त्यास प्रतिसाद मिळत नसल्याचे निदर्शनात आले.
लाखो रूपये खर्च करून दर्जेदार शिक्षण देणाºया इंग्रजी व अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये मुलांचे केजी ते पहिलीच्या वर्गाचे शालेय प्रवेश श्रीमंत पालक घेतात. याप्रमाणे आर्थिक दुर्बल घटक, मागासवर्गीय परिवारातील मुलां - मुलीना देखील या शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यासाठी जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रवेश राखीव ठेवले. पण शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आजूनही या आरटीईच्या राखीव जागांवर प्रवेश सुरू आहेत. त्यास पालकांकडून मात्र प्रतिसाद मिळत नसल्याची बाब या चौथ्या फेरी अखेरही उघड झाली. या फेरीमध्ये २७६ बालकांचे प्रवेश निश्चित केले होते. त्यापैकी केवळ ६७ बालकांचे प्रवेश घेण्यात आले. उर्वरत पाच अर्ज रिजेक्ट केले आणि २०६ बालकांच्या आईवडीलांनी संबंधीत शाळांमध्ये संपर्कच साधलेला नसल्याचे प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
प्लेगृप, फ्रीकेजी, ज्युनिअर केजी, सिनिअर केली आणि फर्स्ट म्हणजे पहिलीच्या वर्गात या २५ टक्के आरक्षणातून बालकांना मोफत प्रवेश आहे. शिक्षणाचा हक्क या कायद्याखाली जिल्ह्यातील दर्जेदार शिक्षण देणा-या ६४० शाळांमध्ये या ११ हजार ४७० जागा आजपर्यंत शिल्लक दिसतआहेत. पहिल्या दोन फे-यांव्दारे पाच हजार ३५२ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. आता तिस-या फेरी अखेर ९३९ निवडलेल्यापैकी ३४५ जणांचे प्रवेश झाले. उर्वरित ४७६ जणांनी संबंधीत शाळेत प्रवेश घेतला नाही आणि आता चौथ्याफेरीत केवळ ६७ बालकांचे प्रवेश झाले आहेत. पालकांचा प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या पाचव्या फेरीतील