यंदा शिक्षकांच्या बदल्या नाहीत

By admin | Published: May 11, 2017 01:58 AM2017-05-11T01:58:49+5:302017-05-11T01:58:49+5:30

शिक्षकांच्या बदल्यांचा विषय चर्चेचा व जिल्हा परिषद प्रशासनाचा तसा डोकेदुखीचा विषय आहे. परंतु, तरीही यंदा या शिक्षकांच्या

This year, there are no teacher transfers | यंदा शिक्षकांच्या बदल्या नाहीत

यंदा शिक्षकांच्या बदल्या नाहीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शिक्षकांच्या बदल्यांचा विषय चर्चेचा व जिल्हा परिषद प्रशासनाचा तसा डोकेदुखीचा विषय आहे. परंतु, तरीही यंदा या शिक्षकांच्या बदल्यांऐवजी केवळ शाळांचे केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी संवर्गाच्या बदल्या हाती घेतल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे या प्रशासकीय व विनंती बदल्या होणार आहेत. शाळा सुरू होण्याआधी या केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी या बदल्यांसाठी पात्र ठरवले आहे. यासाठी ज्येष्ठता सूचीचा वापर करण्यात येणार आहे. याशिवाय, एनकेटी सभागृहात जिल्हा परिषदेसह पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुखांना एकत्र बसवून त्यांच्यासमोर पारदर्शक पद्धतीने बदलीचे ठिकाण त्यांच्या पसंतीने दिले जाईल. यास समुपदेशन बदली प्रक्रिया असे संबोधले जाते. या पद्धतीमुळे कोणावरही अन्याय न होता त्यांच्यासमक्ष रिक्त शाळा, ठिकाणांची यादी स्क्रीनवर दाखवली जाईल.

Web Title: This year, there are no teacher transfers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.