यंदाचा अर्थ संकल्प हा एका वर्षाचा असला तरी यात दशकाचा विचार   - दीपक करंजीकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 04:29 PM2020-02-04T16:29:39+5:302020-02-04T16:43:11+5:30

ठाणे  : यंदाचा अर्थसंकल्प हा एका वर्षाचा असला तरी यात दशकाचा विचार केलेला आहे. जागतिकीकरण, खाजगिकारण, उदारीकरण या १९९१ ...

This year's concept is one year old, but it has decades of thought - Deepak Karanjikar | यंदाचा अर्थ संकल्प हा एका वर्षाचा असला तरी यात दशकाचा विचार   - दीपक करंजीकर 

यंदाचा अर्थ संकल्प हा एका वर्षाचा असला तरी यात दशकाचा विचार   - दीपक करंजीकर 

Next
ठळक मुद्देवर्षाचा संकल्प, दशकाचा विचार - दीपक करंजीकर अर्थभान आणि संकल्प याचा समन्वय - डॉ. अभिजित फडणीस आर्थिक मंदी की संधी या पुस्तकाचे प्रकाशन 

ठाणे : यंदाचा अर्थसंकल्प हा एका वर्षाचा असला तरी यात दशकाचा विचार केलेला आहे. जागतिकीकरण, खाजगिकारण, उदारीकरण या १९९१ च्या बदलानंतर पुन्हा एक मोठा बदल घडविण्याचे संकेत अर्थ संकल्पाने दिला आहे. केवळ सवलतीचा विचार करण्यापेक्षा संपूर्ण देशाच्या अर्थकारणाचा विचार करायला लावणारा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते, अर्थ विश्लेषक, उदयॊजक, लेखक, अभिनेते दीपक करंजीकर यांनी केले.

          दीनदयाळ प्रेरणा केंद्र आयोजित स्व, भगवानराव पटवर्धन स्मृती व्याख्यानात अर्थसंकल्प २०२० या विषयवार दीपक करंजीकर बोलत  होते. येथील सहयोग मंदिराच्या सभागृहात व्याख्यान झाले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष  अर्थ अभ्यासक डॉ. अभिजित फडणीस, दीनदयाळ प्रेरणा केंद्राचे अध्यक्ष भा. वा. दाते, कार्यवाह मकरंद मुळे, सदस्य संजीव ब्रह्मे उपस्थित होते. या व्याख्यानाच्या निमित्त डॉ. अभिजित फडणीस यांनी लिहिलेल्या आर्थिक मंदी की संधी या पुस्तकाचे प्रकाशन दीपक करंजीकर यांच्या हस्ते झाले. आपल्या भाषणात डॉ. दीपक करंजीकर म्हणाले, अर्थसाक्षरतेच्या पुढचे पाऊल या अर्थसंकल्पाने टाकले आहे. हा अर्थसंकल्प दीर्घकाळाचा विचार मांडतो. वर्ष २०३० पर्यंतच्या आर्थिक बदलांची पायाभरणी या अर्थसंकल्पात आहे. आपल्या सवयी बदलायला लावणारा हा अर्थसंकल्प आहे. गुंतवणूक केवळ कर वाचविण्यासाठी नव्हेतर भविष्याचा विचार करण्यासाठी हे सूत्र अर्थसंकल्पात मांडले आहे. देशाचा गियर या अर्थसंकल्पाने बदलला आहे. हा बदल लक्षात घेऊन अर्थसंकल्पावर चर्चा केली पाहिजे. असे दीपक करंजीकर यांनी सांगितले.  आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. अभिजित फडणीस म्हणाले,  अर्थसंकल्प म्हणजे अर्थभान आणि संकल्प यांचा समन्वय आहे. आकडेवारीपेक्षा संकल्पावर भर देण्याचा पायंडा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाला आहे त्याचे स्वागत केले पाहिजे. येत्या तीन वर्षात शेतकऱ्याचे उत्पन्न दुप्पट करण्याचा संकल्प त्यातीलच एक भाग आहे. रासायनिक खर्चिक शेतीपासून परत एकदा पारंपारिक नैसर्गिक आणि जैविक शेतीकडे वाटचाल करण्याचा आणि त्यातून शेतकऱ्यांची बचत वाढवण्याचा निर्धार आणि त्याचबरोबर अन्नदाता ते उर्जादाता, जैविक विविधता जपणारी आणि स्त्रियांना त्यांचा अधिकार परत प्रदान करणारी धान्यलक्ष्मी योजना या माध्यमातून काही मूलभूत बदल होणार आहेत. पायाभूत साधने, स्वच्छ भारत आणि उत्तम रेल्वे आणि नवीन १०० विमानतळ यांची सांगड पर्यटनाशी घातली जाणार आहे. आपली सिंधू-सरस्वतीवर आधारित पुरातन संस्कृती, आपलं कलावैविध्य हे जगाला खुणावत आहे आणि त्यातून पर्यटनाचे नवीन आयाम जोडले जाणार आहेत. तसेच भारतातील तरुण हा जगाच्या मागण्या पूर्ण करणारा शिक्षक, परिचारक, तंत्रज्ञ होऊ शकतो ही नवी दिशा देखील अर्थसंकल्पात आहे. वित्तीय शिस्त पाळत, जनसामान्यांसाठी नवीन संधी उपलब्ध करून देणारा हा अर्थसंकल्प आहे,  असेही डॉ. अभिजित फडणीस म्हणाले.  प्रमुख वक्ते दीपक करंजीकर यांचे स्वागत भा.वा .दाते यांनी तर, अध्यक्ष डॉ. अभिजित फडणीस यांचे स्वागत संजीव ब्रह्मे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीनदयाळ प्रेरणा केंद्राच्या भरत अनिखिंडी यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद घोलप यांनी आणि वक्त्यांचा परिचय कल्पना राईलकर यांनी करून दिला. व्याख्यानाला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. सभागृह तुडुंब भरले होते.  

Web Title: This year's concept is one year old, but it has decades of thought - Deepak Karanjikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.