येऊरच्या जखमी बिबट्याचा लागला शोध; बोरिवली येथे उपचारासाठी हलविले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:42 PM2020-12-16T16:42:13+5:302020-12-16T16:42:19+5:30

येऊर येथे लाईट हॉटेल पाठीमागील संरक्षित क्षेत्रात मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास बिबट्या आढळला होता.

Yeoor's wounded leopard was discovered; Moved to Borivali for treatment | येऊरच्या जखमी बिबट्याचा लागला शोध; बोरिवली येथे उपचारासाठी हलविले 

येऊरच्या जखमी बिबट्याचा लागला शोध; बोरिवली येथे उपचारासाठी हलविले 

googlenewsNext

ठाणे: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत असलेल्या येऊरच्या जंगलात मंगळवारी सायंकाळी बिबट्याचे दर्शन काही ग्रामस्थांना झाले होते. बिबट्याच्या वावराने परिसरात घबराट पसरली होती. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर वन अधिकारी मंगळवारपासून जखमी बिबट्याचा शोध घेत होते. अखेर बुधवारी सकाळी अशक्त जखमी बिबट्याला वन विभागाने बेशुद्ध करीत ताब्यात घेतले.  त्याला बोरीवली येथील वन्यजीव बचाव केंद्रात उपचारासाठी हलविल्याची माहिती येऊर वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली. 

येऊर येथे लाईट हॉटेल पाठीमागील संरक्षित क्षेत्रात मंगळवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास बिबट्या आढळला होता. हा बिबट्या जखमी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले होते. जखमी बिबट्याची माहिती मिळताच येऊर वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी झाडीत बिबट्याचा वावर आढळून आला बिबट्याचा तोल जात असल्याचे व तो काही अंतर चालून जागेवर बसत असल्याचे कर्मचाऱ्यांस दिसून आले. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहाय्यक वनसंरक्षक दिगंबर दहिबावकर, बोरीवली बचाव पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय भारवदे, पशूवैद्यकीय अधिकारी शैलेश पेठे  यांच्या पथकास घटनास्थळी बोलाविण्यात आले.

पथक पोहोचेपर्यंत रात्रीचे 9 वाजल्याने काळोख पडला हा बिबटा पुर्णपणे शुद्धीत व आक्रमक असल्याने प्रतिहल्ला करण्याची दाट शक्यता होती म्हणून ही शोध मोहिम थांबविण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी सकाळी 8 वाजता पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली. सकाळी 9 वाजता आजारी बिबट्या झाडीत बसल्याचे दिसून आले. त्याची हालचाल यावेळी मात्र कमी होती. त्याला उपचाराची गरज असल्याने बचाव पथकास बोलाविण्यात आले. सकाळी 10.30 च्या सुमारास पशुवैद्यकांनी त्याल भुलीचे इंजेक्शन देऊन त्याची प्राथमिक तपासणी केली. प्राथमिक उ

Web Title: Yeoor's wounded leopard was discovered; Moved to Borivali for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.