प्रतिकारशक्तीसाठी योगाभ्यास आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:26 AM2021-06-22T04:26:57+5:302021-06-22T04:26:57+5:30

ठाणे : कोरोनाग्रस्त जग आज सातवा जागतिक योग दिन साजरा करीत आहे. त्यावर उपाय म्हणून लस आपण मान्य ...

Yoga is essential for immunity | प्रतिकारशक्तीसाठी योगाभ्यास आवश्यक

प्रतिकारशक्तीसाठी योगाभ्यास आवश्यक

Next

ठाणे : कोरोनाग्रस्त जग आज सातवा जागतिक योग दिन साजरा करीत आहे. त्यावर उपाय म्हणून लस आपण मान्य करूया. कोरोना-१९ या महामारीवर मात करण्यासाठी नियमित योगाभ्यास हा रामबाण उपाय आहे. त्यायोगे आपल्या शरीरात निर्माण होणारी प्रतिकारशक्तीच कोरोनाला नामोहरम करेल. म्हणून प्रतिकारशक्ती वाढीसाठी योगाभ्यास अत्यावश्यक आहे , असे मनोगत ठाण्याचे ज्येष्ठ योगप्रशिक्षक प्रवीण धुरी यांनी व्यक्त केले.

सातव्या जागतिक योग दिनानिमित्ताने श्री आनंद भारती समाज, ठाणे (पूर्व ) व श्री अंबिका योग कुटीर, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने 'योगाची आवश्यकता' या विषयावर शिबिरात ते बोलत होते. यात पंधरा साधक सहभागी झाले. त्यात रमेश कोळी, प्रमोद नाखवा, मीनाक्षी कोळी व स्वप्नाली गुजर या सहायक प्रशिक्षकांचाही सहभाग लाभला.

---------

Web Title: Yoga is essential for immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.