योगी सरकारला मनसेकडून बांगड्यांचा आहेर; हाथरस हत्याकांडाचा केला निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 05:43 PM2020-10-13T17:43:20+5:302020-10-13T17:43:39+5:30
बलात्कार व हत्या प्रकरणात नराधम आरोपींना त्वरित कारवाई करीत फाशावर लटकवा, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
उल्हासनगर: हाथरस हत्याकांडातील उत्तरप्रदेश सरकार व प्रशासनाच्या संशयीत भूमिकेचा मनसेकडून मंगळवारी निषेध केला. तसेच योगी सरकारला बांगड्यांचा आहेर दिल्याची माहिती मैनुद्दीन शेख यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-२ परिसरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी दुपारी एकत्र येत उत्तरप्रदेश येथील हाथरस मधील मुलीवर अत्याचार करून खून केल्याचा निषेध केला. तसेच पिडीत मुलीसह कुटुंबाला न्याय देण्या ऐवजी, योगी सरकार वेगवेगळ्या मार्गाने कसे दबाव आणत आहे. हे संपूर्ण देश व जगाने पहिल्याची प्रतिक्रिया यावेळी पक्षाचे संघटक मैनुद्दीन शेख यांनी व्यक्त केली.
बलात्कार व हत्या प्रकरणात नराधम आरोपींना त्वरित कारवाई करीत फाशावर लटकवा, अशी मागणी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. तसेच गेल्या महिना भरात बलात्काराच्या घटनेत वाढ होऊनही उत्तर प्रदेशतील योगी सरकार, पोलीस प्रशासन तसेच स्थानिक जिल्हा प्रशासनाचा उल्हासनगर मनसे कडून जाहीर निषेध नोंदविण्यात आला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना,उल्हासनगर शहर यांच्या वतीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांना पोस्टाने बांगड्या भेट म्हणून पाठविण्यात आहेत.
मनसेच्या आंदोलनात उल्हासनगर शहर संघटक मैनुद्दीन शेख, प्रवीण माळवे, वाहतूक सेनेचे शहर अध्यक्ष काळू थोरात, अक्षय धोत्रे, मॅक्स लोखंडे, महिला सेनेच्या विभाग अध्यक्षा शफिया सय्यद, मीना मोरे, रेखा झा आदीसह मनसेचे आणि महिला सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.