पुलावरून पडून तरुणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:38 AM2021-05-17T04:38:33+5:302021-05-17T04:38:33+5:30
भिवंडी : भिवंडीतील कल्याण नाका ते साईबाबा राजनोली नाका दरम्यानच्या उड्डाणपुलावर कार व दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेने युवक ...
भिवंडी : भिवंडीतील कल्याण नाका ते साईबाबा राजनोली नाका दरम्यानच्या उड्डाणपुलावर कार व दुचाकी यांच्यात झालेल्या जोरदार धडकेने युवक उड्डाण पुलावरून ४० फूट खाली रस्त्यावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अमोल वरकुटे (३४) असे मृत तरुणाचे नाव आहे.
भिवंडीतील कल्याण नाका ते साईबाबा राजनोली नाका दरम्यान बनविण्यात आलेल्या बाळासाहेब ठाकरे उड्डाणपुलावरून शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास अमोल हा दुचाकीवरून कल्याणच्या दिशेने जात होता. कल्याणहून भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या कारची चालक महिला ही भरधाव येत असताना नियंत्रण सुटल्याने दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन त्यात दुचाकीवरील अमोल हा पुलावरून खाली पडला. त्यात त्याचा मृत्यू झाला. या अपघाताची शांतीनगर पोलीस ठाण्यात नोंद करून कार चालक महिलेस अटक केली आहे.