गणेश विसर्जनावेळी तरुण बुडाला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 01:17 AM2020-08-30T01:17:56+5:302020-08-30T01:18:14+5:30
अमोल पवार (१८, रा. विठ्ठलवाडी) हा लहान भावासह म्हारळ येथे आजीकडे गणपतीसाठी आला होता. शुक्र वारी सायंकाळी सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी म्हारळ येथील खदाणीत तो आला होता.
म्हारळ : गणेशोत्सवासाठी म्हारळ येथे आजीकडे आलेला तरु ण विसर्जनावेळी बुडाल्याची घटना शुक्र वारी सायंकाळी घडली आहे. दरम्यान, शनिवारी सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
अमोल पवार (१८, रा. विठ्ठलवाडी) हा लहान भावासह म्हारळ येथे आजीकडे गणपतीसाठी आला होता. शुक्र वारी सायंकाळी सात दिवसांच्या गणपतीच्या विसर्जनासाठी म्हारळ येथील खदाणीत तो आला होता. त्यावेळी मामाच्या पाठीमागे अमोल आणि लहान भाऊ मनोज हे खदाणीत उतरले. पण, पाण्याचा अंदाज न आल्याने ते २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात गेले. इतरांच्या लक्षात आल्याने मनोज याला बाहेर काढण्यात यश आले.
परंतु, अमोल सापडला नाही. त्यामुळे उल्हासनगर येथील अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. जवानांनी बोटीद्वारे त्याचा शोध घेण्यास सुरुवात के ली. मात्र, अंधारामुळे अग्निशमन दलाने शोधमोहीम थांबविली.
शनिवारी दुपारी पुन्हा त्यांनी शोधमोहीम सुरू केली. मात्र, त्याचा शोध लागू शकला नव्हता. त्यामुळे शोधमोहीम सुरूच राहील, असे अग्निशमन दलाचे अधिकारी बाळासाहेब नेटके यांनी सांगितले.