तरुणाचा मृतदेह मिळाला ७४ तासानंतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:30 AM2021-07-17T04:30:09+5:302021-07-17T04:30:09+5:30
मुंब्रा : मंगळवारी दुपारी मुंब्रा अग्निशमन दलाजवळ असलेल्या चुहा ब्रिजवरून खाडीत उडी मारलेल्या अरबाज शेख (वय २२) या तरुणाचा ...
मुंब्रा : मंगळवारी दुपारी मुंब्रा अग्निशमन दलाजवळ असलेल्या चुहा ब्रिजवरून खाडीत उडी मारलेल्या अरबाज शेख (वय २२) या तरुणाचा मृतदेह तब्बल ७४ तासानंतर शुक्रवारी दुपारी मध्यरेल्वेच्या जलद मार्गावरील लोखंडी पुलाजवळ आढळून आला. तो ठाकूरपाडा परिसरातील सायरा अपार्टमेंन्टमध्ये राहत होता. तो ज्या मुलीवर प्रेम करत होता, तिचे अन्य एका मुलाबरोबर प्रेमसंबंध असल्याचे कळल्यानंतर वैफल्यग्रस्त होऊन त्याने खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याची माहिती त्याच्या मित्राने दिली. मच्छिमारी करणाऱ्या स्थानिक तरुणाच्या मदतीने अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा मृतदेह खाडीबाहेर काढून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात दिल्याची माहिती ठामपाच्या आपत्कालीन विभागाचे प्रमुख अधिकारी संतोष कदम यांनी दिली.