तरुणांनी ताज्या विषयांवर केली मनमोकळी चर्चा, अजेय संस्थेचा कार्यक्रम संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 04:40 PM2019-04-01T16:40:48+5:302019-04-01T16:43:25+5:30
ठाण्यातील अजेय नाट्यसंस्थेला 1 एप्रिल 2019 ला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत.
ठाणे : सहयोग मंदिर येथे अजेय संस्थेचा दशकपूर्ती महोत्सव अजेय संस्था आणि व्यास क्रिएशन्स प्रकाशन संस्था ह्यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वसंवाद' आयोजित केला होता. जागतिक कीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ह्या कार्यक्रमाचे साजराकरण्याचे स्वरूप वैशिष्ट्यपूर्ण होते. 'अपना टाईम आयेगा म्हणजेच वेगळी वाट निवडलेले कलाकार' , 'हार्दिक निमंत्रण म्हणजेच आयोजन व पाडद्यामागची आव्हानं' , 'हाऊज द जोश म्हणजेच चळवळीतील तरुण सहभाग' आशा ताज्या विषयांवर चर्चासत्र रंगली.
अभिनेता पवन वेलकर, पै फ्रेंड्स लायब्ररीचा संस्थापक सदस्य भूषण पत्की, संगीतकार-गायक सोहम पाठक, लेखिका स्वाती भट, छायाचित्रकार व लेखिका गार्गी गीध ह्या तरुण कलाकारांनी अपना टाइम आयेगा चर्चा सत्रात त्यांच्या वेगळ्या वाटेवर मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि तरुणाईच्या मनातील अनेक प्रश्न विचार रसिकांसमोर मांडले, त्यांच्या प्रेरणांविषय गप्पा मारल्या. सायली शिंपी हिने ह्या सगळ्यांशी संवाद साधला. आयोजक व कवी संकेत म्हात्रे, आयोजक व प्रकाशक निलेश गायकवाड, संगीतकार व आयोजक वृंदा दाभोळकर, आयोजक कार्तिक हजारे-हेमांगी कुळकर्णी, नेपथ्य नियोजक वर्षा ओगले-कल्पेश पाटील ह्या सर्व आयोजकांनी हार्दिक निमंत्रण चर्चा सत्रात आयोजनातील अडचणी व उपायोजना ह्यावर अनेक पैलूंना चर्चा केली. तपस्या नेवे ह्यांनी सर्वांशी संवाद साधला. डॉ.क्षितिज कुलकर्णी, वसंती वर्तक, प्रा. दीपा ठाणेकर,प्रा.विद्याधर वालावलकर, क्षितिज देसाई ह्यांनी हाऊज द जोशमध्ये चळवळ व तरुण ह्या नाजूक विषयावर अनेक निरीक्षणं व मत मांडली, चळवळीत आवश्यक बदल अनेक पैलूंना सांगितले. ह्या सर्वांशी अवधूत यरगोळे ह्याने संवाद साधला. ह्या कार्यक्रमाची संकल्पलना संस्थेचे संस्थापक डॉ. क्षितिज कुलकर्णी ह्यांची असून येणाऱ्या प्रोजेक्ट्स बद्दल गौरव संभुस ने मुलाखतीत सांगितले. 'इंद्रायणी काठी' व 'खेड्यामधले घर कौलारू' हे दोन काव्यचित्रपट , तर 5 3 2 टीम तर्फे ध्वन्य ध्वन्य महाराष्ट्र ह्या पु.लं.देशपांडे लिखित उताऱ्याचे अभिवचन, अजेय संस्थेचे अध्यक्ष गौरव संभुस ह्याची निवेदक व मुलाखतकार सौरभ सोहिनीने घेतलेली मुलाखत असे सुंदर पॅकेज रसिक प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले. आभार प्रदर्शनात मनीषा चव्हाण ह्यांनी स्वरचित काव्यांनी रंग वाढवला. ह्या संपूर्ण कार्यक्रमाचे पाहुणे जागतिककीर्तीचे चित्रकार विजयराज बोधनकर सर ह्यांनी त्यांच्या ओघवत्या शैलीने कळस चढवला.