पंजाबमध्ये खलिस्तानी पाठिंब्याने आपचे सरकार; भाजपा नगरसेवकांचे मुक्ताफळे, गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2022 01:08 PM2022-03-18T13:08:01+5:302022-03-18T13:08:21+5:30
उल्हासनगर भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी देशातील ५ पैकी ४ राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याचा आनंद पेढे वाटून केला.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : पंजाब मध्ये खलिस्तानी समर्थकांनी आप पक्षाला पाठिंबा दिल्याने, आपचे सरकार आल्याचे मुक्ताफळे भाजप नगरसेवक राजेश वधारीया यांनी शहरातील एका व्हाट्सएप ग्रुपवर उधळले. याप्रकरणी संतप्त झालेल्या नागरिकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेतल्यावर वधारीया यांच्यावर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
उल्हासनगर भाजप कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी देशातील ५ पैकी ४ राज्यात झालेल्या निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्याचा आनंद पेढे वाटून केला. यादरम्यान भाजपचे नगरसेवक राजेश वधारीया यांनी शहरातील एका व्हाट्सएप ग्रुपवर खलिस्तानी समर्थकांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिल्याने, आपचे सरकार निवडून आले. अशी टिपण्णी केली. या टिपण्णीने संतप्त झालेल्या काही नागरिकांनी उल्हासनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन वधारीया यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी झाली.
घटनेचे गांभीर्य बघून उल्हासनगर पोलिसांनी हरिसिंग चरणसिंग लबाना यांच्या तक्रारीवरून गुरवारी सायंकाळी वधारीया यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत असून वधारीया यांच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते कमलेश निकम यांनी चांगलाच समाचार घेतला असून वक्तव्याचा पक्षाच्या वतीने निषेध केला.