काँग्रेस गटनेत्याचे घरास आग लावणा-या तरुणास अटक ; पसार मुख्य आरोपीची आई होती निवडणुकीत भाजपाची उमेदवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 09:16 PM2018-02-04T21:16:06+5:302018-02-04T21:16:10+5:30

मद्यपी टोळक्याने दुचाकी घेऊन जमणारयांची तक्रार केली म्हणुन काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांचे घर पेटवुन हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी नया नगर पोलीसांनी आसिफ अनवर खान (३०) या आरोपीस अटक केली आहे.

The youth of Congress group leader's house was arrested; Pace was the main accused's mother, BJP candidate in the elections | काँग्रेस गटनेत्याचे घरास आग लावणा-या तरुणास अटक ; पसार मुख्य आरोपीची आई होती निवडणुकीत भाजपाची उमेदवार

काँग्रेस गटनेत्याचे घरास आग लावणा-या तरुणास अटक ; पसार मुख्य आरोपीची आई होती निवडणुकीत भाजपाची उमेदवार

Next

मीरारोड - मद्यपी टोळक्याने दुचाकी घेऊन जमणारयांची तक्रार केली म्हणुन काँग्रेसचे गटनेते जुबेर इनामदार यांचे घर पेटवुन हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी नया नगर पोलीसांनी आसिफ अनवर खान (३०) या आरोपीस अटक केली आहे. मुख्य सुत्रधार असलेला दुसरा आरोपी युनेब नासिर केवल याचा पोलीस शोध घेत असले तरी युनेबची आई पालिका निवडणुकीत भाजपाची उमेदवार असल्याचे समोर आल्याने जुबेर यांचे घर पेटवण्या मागे राजकिय सुड असल्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.

नया नगर मधील मिरा स्मृती इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारया जुबेर यांच्या घराच्या दारावर आसिफ अनवर खान (३२) ने पॅट्रोल ओतुन बाहेरुन कडी लावत आग लावली होती. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास आसिफने आग लावल्याचे जुबेर यांच्या घरा समोर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेज वरुन उघड झाले. इमारतीतील सीसीटीव्ही मध्ये देखील असिफ पळुन बाहेरील कार मध्ये साथीदारासह नीघुन गेल्याचे स्पष्ट झाले.

आग लावली तेव्हा जुबेर हे पत्नीसह नातलगाच्या अंत्यसंस्कारासाठी चिपळुणला गेले होते. घरात त्यांच्या दोन मोठ्या मुली होत्या. आग लागल्याचे वेळील कळल्याने त्यांनी घरातील दार व लगतच्या शोकेसला लागलेली आग विझवली होती.

शनिवारीच जुबेर यांच्या लहान मुलीने दिलेल्या फिर्यादी नंतर नया नगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केला म्हणुन आसिफ सह युनेब नासिर केवल रा. पंचरत्न , मस्जिद मागे, नयानगर विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता .

दोन दिवसां पुर्वीच मस्जीद गल्ली त पोलीस , रहिवाशी आदिंची अमली पदार्थ विरोधी जनजागृतीची बैठक झाली होती. त्यावेळी नशा करणारे तसेच काही मद्यपी तरुण पारीसरात दुचाकी घेऊन टोळक्याने उभे राहतात या बद्दल इनामदार यांनी जाहिर तक्रार करत कारवाईची मागणी केली होती.

पोलीसांनी आसिफला अटक केली असता तो युनेब हा उत्तन भागात चालवत असलेल्या पुर्नवसन केंद्रात काम करत असल्याचे समोर आले. युनेबने त्याला दारु पाजुन जुबेर यांच्या घरास आग लावण्यास पाठवल्याचे मान्य केल्याचे पोलीस सुत्रांनी सांगीतले. युनेबने जुबेर यांच्या तक्रारीचा राग धरुन हे जळीतकांड घडवुन आणल्याची शक्यता वर्तवली जात असली तरी गेल्या वर्षी आॅगस्ट मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत सदर प्रभागातुन युनेबची आई भाजपाच्या तिकटावर निवडणुक लढली होती. निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या सारा अक्रम यांनी तीचा दारुण पराभव केला होता. या प्रभागात काँग्रेसचे चारही उमेदवार जिंकले आहे. त्यामुळे जुबेर यांनी मद्यपी व नशा करणारया टोळक्यां विरुध्द केलेली तक्रार हे त्यांचे घर जाळण्या मागचे कारण असले तरी युनेबच्या आईचा प्रभागातुन झालेला दारुण पराभव देखील या मागे असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे .

Web Title: The youth of Congress group leader's house was arrested; Pace was the main accused's mother, BJP candidate in the elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.