भिवंडीतील गोदाम दुर्घटनेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 04:26 PM2021-02-02T16:26:49+5:302021-02-02T16:28:14+5:30

Bhiwandi godown building collapse : मृतांची संख्या दोन वर तर गोदाम मालकांसह देखभाल करणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल 

Youth dies who was injured in Bhiwandi godown building collapse | भिवंडीतील गोदाम दुर्घटनेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

भिवंडीतील गोदाम दुर्घटनेत जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Next
ठळक मुद्देधनाढ्य विकासक स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकसित करण्यासाठी घेवून वर्षानुवर्ष त्यांच्या हिश्याचे विकसित बांधकाम देण्यास टाळाटाळ करत असतात , त्यातच जे विकसित बांधकाम शेतकऱ्यांना दिले जाते ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे.

नितिन पंडीत

भिवंडी - भिवंडी तालुक्यातील दापोडे ग्रामपंचायत हद्दीतील हरिहर कंपाऊंड येथे सोमवारी सकाळी तळ अधिक एक मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या  दुर्घटनेत ढिगाऱ्या खालून तब्बल सात तासांनी जखमी अवस्थेत बाहेर काढलेल्या ऋतिक सुरेश पाटील ( वय १९,  रा.डुंगे ) याची ठाणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान प्राणज्योत मालवली असून या दुर्घटनेत मृतांची संख्या दोन वर पोहचली आहे . या दुर्घटने नंतर ग्रामीण भागातील गोदाम पट्ट्यातील बांधकामांचा तसेच अनधिकृत बांधकाम व निकृष्ठ बांधकामांचा प्रश्न चर्चेत आला असताना स्थानिक नारपोली पोलिसांनी या दुर्घटनेस जबाबदार धरत मूळ गोदाम मालक सूर्यकांत विठ्ठल पाटील ,रामचंद्र शांताराम पाटील ,महादेव शांताराम पाटील यांसह या गोदामांच्या देखभालीची जबाबदारी असणाऱ्या व्ही आय बिल्डकॉम प्रा.लि. या विकासक कंपनीस जबाबदार धरत त्यांच्या विरोधात विविध कलमानुसार सोमवारी रात्री उशिराने गुन्हा दाखल केला आहे . या दुर्घटनेत एकूण बारा गोदामांचे नुकसान झाले असून दोन जणांच्या मृत्यु सह पाच जण जखमी झाले आहेत.
          

भिवंडीतील ग्रामीण भागात गोदाम पट्टा झपाट्याने वाढला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या जमिनी विकासक आपल्या ताब्यात घेऊन सुस्थितीतील गोदामे स्वतःच्या ताब्यात घेऊन त्याच्या विक्रीतून बक्कळ पैसा कमावून स्थानिक जमीन मालकांना कमकुवत बांधकामे असलेली मालमत्ता देऊन त्यांची फसवणूक करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर होत असून या परिसरातील बांधकामांवर एमएमआरडीए प्रशासनाचे लक्ष नसल्याने मोठया प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होऊन स्थानिक शेतकरी जमीन मालक व शासन यांची फसवणूक करीत असल्याचे अनेक प्रकार समोर येत आहेत. विकासकांच्या या मनमानी कारभाराला आळा घालणे गरजेचे असून एमएमआरडीए प्राधिकरणासह महसूल विभागाने त्यासंदर्भात लक्ष देणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे .
 

भिवंडीमध्ये गोदाम कोसळून एकाचा मृत्यू , सहा जण जखमी

 

हि दोस्ती तुटायची नाय; मित्राने आवाज दिला नसता तर आज मी वाचलो नसतो  

        

दरम्यान धनाढ्य विकासक स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकसित करण्यासाठी घेवून वर्षानुवर्ष त्यांच्या हिश्याचे विकसित बांधकाम देण्यास टाळाटाळ करत असतात , त्यातच जे विकसित बांधकाम शेतकऱ्यांना दिले जाते ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे. सोमवारी दापोडा येथे घडलेली घटना देखील तशीच आहे. गोदाम पडल्यावर खऱ्या अर्थाने असे कमकुवत बांधकाम करणारे ठेकेदार व वास्तुविशारद यांचेवर गुन्हे दाखल करणे अभिप्रेत असताना पोलीस यंत्रणा मात्र स्थानिक शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करत आहेत हे दुर्दैवी आहे. स्थानिक भूमिपुत्रांमधे असंतोष पसरवण्याचे काम पोलीस प्रशासन करीत आहे. या अन्यायाविरद्ध आम्ही नक्कीच भूमिपुत्र शेतकऱ्यांना योग्य तो न्याय मिळवून देऊ प्रसंगी रस्त्यावर देखील उतरू अशी प्रतिक्रिया आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे अध्यक्ष अँड.भारद्वाज चौधरी यांनी दिली आहे.

Read in English

Web Title: Youth dies who was injured in Bhiwandi godown building collapse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.