रविवारी ठाण्यात रंगणार वंचितांचा रंगमंचावरील युवा नाट्य जल्लोष !, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2019 04:57 PM2019-12-28T16:57:20+5:302019-12-28T17:09:45+5:30

रविवारी ठाण्यात वंचितांचा रंगमंचावरील युवा नाट्य जल्लोष  रंगणार आहे. 

Youth drama on the stage of the children will be staged in Thane on Sunday! | रविवारी ठाण्यात रंगणार वंचितांचा रंगमंचावरील युवा नाट्य जल्लोष !, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर

रविवारी ठाण्यात रंगणार वंचितांचा रंगमंचावरील युवा नाट्य जल्लोष !, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर

Next
ठळक मुद्देरविवारी वंचितांचा रंगमंचावरील युवा नाट्य जल्लोष महिला सक्षमता आणि निर्भयता या विषयांवर उत्तमोत्तम नाटिका हा कार्यक्रम रविवार दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५:३० वा. होणार

ठाणे : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ठाण्यात समता विचार प्रसारक संस्था आणि बालनाट्य आयोजित वंचितांचा रंगमंच अर्थात युवा नाट्यजल्लोष २०१९ चे आयोजन करण्यात आले आहे. यात माजिवाडा गट वर्णभेद, किसननगर गट मेट्रो आणि वृक्षकत्तल, सावरकर नगर गट दृष्टिकोन, कळवा गट एड्स आणि मानपाडा गट महिला सक्षमता आणि निर्भयता या विषयांवर उत्तमोत्तम नाटिका सादर करणार आहेत.  हा कार्यक्रम रविवार दिनांक २९ डिसेंबर २०१९ रोजी सायंकाळी ५:३० वा. होणार आहे.

      दरवर्षी वंचितांच्या रंगमंचावर ज्वलंत विषय हाताळलेले जातात. यंदाही याचा प्रतीत ठाणेकरांना येणार आहे. विविध वस्त्यांमधील कलाका रसादरीकरण करणार  आहेत. नाट्यजल्लोषच्या सहाव्या पर्वाचा समारोप साने गुरु जी स्मृतीदिनानिमित्त गडकरी रंगायतन येथे सहा नाटीकांच्या सादरीकरणाने झाला होता.  टी.व्ही. मालिका, मोबाईल यामुळे लहानग्यांच्या मनावर होणारे दुष्परिणाम, घरातील संवाद संपणे, पालकांचे दुर्लक्ष यामुळे मुलांच्या मनाचा होणारा कोंडमारा हे सिद्धेश्वर तलावच्या ‘आम्हाला ही नाटक करायचं आहे’ या नाटिकेतून मांडण्यात आले होते. उद्या, रविवारी संध्याकाळी ५:३० वा. पाचपाखाडी - चंदनवाडी परिसरातील सिद्धेश्वर तलाव जवळील, तीन टाकी खालील काॅ. गोदुताई परूळेकर उद्यानाच्या खुल्या रंगमंचावर एकूण पाच युवा गट नाटिका सादर करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर, प्रथमपासून नाट्य जल्लोष चळवळीचे खंदे समर्थक व ठाण्याचे प्रथम नागरिक नव निर्वाचित महापौर नरेश म्हस्के, वंचितांचा रंगमंचाचे प्रणेते ज्येष्ठ रंगकर्मी रत्नाकर मतकरी, या उपक्रमात सक्रीय सहकार्य करणारे टॅगचे विजू माने, उदय सबिनस, संस्थेचे विश्वस्त जगदीश खैरालिया, अंनिसच्या वंदना शिंदे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाटय जल्लोषच्या संयोजिका हर्षदा बोरकर करणार आहेेत. तसेच त्या साठी प्रवेश विनामूल्य आहे. तरी सर्व संवेदनशील रसिक प्रेक्षकांनी मोच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्या सचिव हर्षलता कदम व सह सचिव अनुजा लोहार यांनी केले आहे. 

 

Web Title: Youth drama on the stage of the children will be staged in Thane on Sunday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.