म्हारळगावच्या खदाणीत तरुणाचा बुडून मृत्यू

By सदानंद नाईक | Published: July 16, 2023 07:34 PM2023-07-16T19:34:16+5:302023-07-16T19:39:48+5:30

सदानंद नाईक उल्हासनगर : म्हारळ क्रांतीनगर मध्ये राहणारा उमेश अंबादास सोनवणे हा मित्रा समवेत शुक्रवारी दुपारी खदाणीत पोहण्यासाठी गेला ...

Youth drowned in Mharalgaon quarry | म्हारळगावच्या खदाणीत तरुणाचा बुडून मृत्यू

म्हारळगावच्या खदाणीत तरुणाचा बुडून मृत्यू

googlenewsNext

सदानंद नाईक
उल्हासनगर :
म्हारळ क्रांतीनगर मध्ये राहणारा उमेश अंबादास सोनवणे हा मित्रा समवेत शुक्रवारी दुपारी खदाणीत पोहण्यासाठी गेला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने, त्याचा मृत्यू झाला असून उल्हासनगर व कल्याण अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याचा शनिवारी मृतदेह बाहेर काढला.

 उल्हासनगर शेजारील म्हारळ गावातील क्रांतीनगर मध्ये राहणार उमेश अंबादास सोनावणे हा तरुण ७ ते ८ मित्रा समवेत म्हारळ गाव हद्दीतील धबधबा व खदानीत शुक्रवारी दुपारी पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने, तो पाण्यात बुडाला. त्याच्या मित्रांनी उल्हासनगर अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिल्यावर, विभागाच्या जवानांनी त्याचा मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

मात्र अंधार झाल्याने, त्यांनी शोध मोहीम थांबविली. दुसऱ्या दिवशी शनिवारी उल्हासनगर व कल्याण अग्निशमन विभागाच्या जवानांनी स्पीड बोटच्या साहाय्याने उमेश याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. याप्रकारने म्हारळ गावात हळहळ व्यक्त होत असून खदान ठिकाणी ग्रामपंचायतने नामफलक लावून पोहण्यास मनाई करावी. अशी मागणी गावकऱ्याकडून होत आहे.

Web Title: Youth drowned in Mharalgaon quarry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.