युवा कबड्डीपटूला राष्ट्रीय पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 05:36 AM2017-08-11T05:36:56+5:302017-08-11T05:36:56+5:30

बदलापूरमधील ग्रामीण भागातून आलेल्या युवा कबड्डीपटूच्या खेळाची दखल कोल्हापूरच्या एका सेवाभावी संस्थेने घेतली आहे. युवकांच्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नेपाळच्या संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावण्यात या खेंळाडूचा मोठा वाटा होता.

Youth Kabbadi National Award | युवा कबड्डीपटूला राष्ट्रीय पुरस्कार

युवा कबड्डीपटूला राष्ट्रीय पुरस्कार

Next

बदलापूर : बदलापूरमधील ग्रामीण भागातून आलेल्या युवा कबड्डीपटूच्या खेळाची दखल कोल्हापूरच्या एका सेवाभावी संस्थेने घेतली आहे. युवकांच्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नेपाळच्या संघाचा पराभव करत विजेतेपद पटकावण्यात या खेंळाडूचा मोठा वाटा होता. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला या संस्थेने राष्ट्रीय कबड्डीपटूचा किताब दिला आहे.
बदलापूरजवळील जांभळे गावात राहणाºया विराज डबरे याला लहानपणापासून कबड्डीची आवड होती. ही आवड पूर्ण करत असताना त्याने गावातील संघातूनच सरावाला सुरुवात केली. जांभळे हे गाव कबड्डीपटूंचे गाव म्हणून ओळखले जाते. त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या वरिष्ठ खेळाडूंकडून त्याला चांगले मार्गदर्शन मिळाले. त्याची चमकदार कामगिरी पाहून १९ वर्षांखालील युवकांच्या महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड झाली. पुढे त्याने या संघाचे कर्णधारपदही भूषवले. या संघातदेखील चांगली कामगिरी केली. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत अंतिम फेरीपर्र्यंत मजल मारली. मात्र, अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा पराभव झाला.
विराजच्या खेळाची दखल घेत त्याची राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली. त्यानंतर, लागलीच २१ वर्षांखालील भारतीय संघातही त्याची निवड निश्चित झाली.
नेपाळ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत (रूरल आॅलिम्पिक) २१ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करत असताना विराजच्या संघाने नेपाळचा पराभव करत विजेतेपद पटकावले. याबद्दल विराजचे कौतुक होत आहे.

मॅटवर सराव सुरूच
मॅटवर कबड्डीचा सराव सुरूच ठेवला आहे. या सर्व प्रवासात त्याच्या खेळाची दखल कोल्हापूरच्या जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेने घेतली.
संस्थेच्या वतीने या होतकरू खेळाडूला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले.

Web Title: Youth Kabbadi National Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.