लॉकडाऊनला कंटाळून घरातून गेलेला युवक पोलिसांमुळे सुखरूप स्वगृही
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 10:05 PM2020-08-26T22:05:22+5:302020-08-26T22:07:13+5:30
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिसांना शाब्बासकी देतानाच, पालकांनीही आपल्या पाल्यांवर अभ्यासाचे अथवा अवास्तव अपेक्षांचे ओझे न लादता मुलांना स्वच्छंदीपणे राहु दया, असे आवाहन केले आहे.
ठाणे : लॉकडाऊनला कंटाळून घरातुन निघुन गेलेल्या 17 वर्षीय युवकाला सुखरूप स्वगृही पोहचवण्याची उत्तम कामगिरी बजावल्याने ठाणेपोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी पोलिसांना शाब्बासकी देतानाच, पालकांनीही आपल्या पाल्यांवर अभ्यासाचे अथवा अवास्तव अपेक्षांचे ओझे न लादता मुलांना स्वच्छंदीपणे राहु दया, असे आवाहन केले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेले पाच महिने लागु करण्यात आलेल्या लॉकडाऊनला आबालवृद्धांसह विद्यार्थीही कंटाळले आहेत. शाळा - कॉलेज बंद असल्याने मुक्तपणे हिंडण्याफिरण्यावर बंधने आली असुन खेळ-क्रिडा,जीम बंद असल्याने कसरतीलाही खीळ बसली आहे. त्यामुळे,ठाण्यातील हिरानंदानी इस्टेट भागात राहणारा 17 वर्षीय युवक बुधवारी भल्या पहाटे सायकल सवारीसाठी घरातुन निघाला.मात्र,सकाळचे 10 वाजले तरी घरी न परतल्याने पालक चिंताग्रस्त बनले.नेहमी सायंकाळी सायकलींगसाठी जाणारा 'तो' आज सकाळीच घरातुन गेला होता.मोबाईलवरही संपर्क होईना.अखेरचे लोकेशन भांडुप दाखवले.त्यामुळे शोधाशोध केल्यानंतर पालकांनी थेट कासारवडवली पोलीस ठाणे गाठुन तक्रार नोंदवली.या तक्रारीची दखल दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त फणसळकर यांनी घेतल्यानंतर सुत्रे हलली आणि कासासवडवली पोलीस, गुन्हे शाखा आणि वाहतुक शाखेच्या पथकाने सर्व अपघात स्थळे तसेच,रुग्णालयांमध्ये चौकशी केली असता, युवकाच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घड़ला नसल्याची खात्री पटली. त्यानंतर,तांत्रिक तपासाच्या आधारे मोबाईल लोकेशन हेरले असता मुंबईतील कुलाबा येथे असल्याचे कळले.त्यानुसार,कुलाबा पोलिसांशी संपर्क साधुन तेथुन त्या युवकाला ताब्यात घेऊन सुखरूप पालकांच्या स्वाधीन केले. ठाण्यातुन पुर्वद्रुतगती मार्गाने मजल दरमजल करीत भांडुप,पवई असा मुंबईत प्रवास करीत कुलाबा भागात पोहचल्याची कबुली युवकाने दिली.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मोठी बातमी! महाड तालुक्यात पाच मजली इमारत कोसळली, अनेकजण अडकल्याची भीती
पत्नी सेक्स करू देत नसल्याने पतीने केली आत्महत्या, पोलिसात गुन्हा दाखल
चिमुकल्या मुलींसह आईने स्वत:ला संपविले, राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील दुर्घटना
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस बॅकफूटवर; जाणून घ्या, सीबीआय कसा करणार तपास?