लोकलसेवा रोखणारा तो तरुण मनोरुग्ण नाही, अखेर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 03:49 AM2019-08-16T03:49:49+5:302019-08-16T03:49:55+5:30

झारखंड येथील मूळ रहिवासी असलेल्या मंगल यादव (२०) याने बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वेस्थानकातील ओव्हरहेड वायर असलेल्या पोलवर चढून अर्धा तास लोकलसेवा रोखून धरली होती.

Youth who stops local service is not Psychiatric | लोकलसेवा रोखणारा तो तरुण मनोरुग्ण नाही, अखेर गुन्हा दाखल

लोकलसेवा रोखणारा तो तरुण मनोरुग्ण नाही, अखेर गुन्हा दाखल

Next

ठाणे : झारखंड येथील मूळ रहिवासी असलेल्या मंगल यादव (२०) याने बुधवारी सायंकाळी ठाणे रेल्वेस्थानकातील ओव्हरहेड वायर असलेल्या पोलवर चढून अर्धा तास लोकलसेवा रोखून धरली होती. याप्रकरणी त्याच्याविरोधात ठाणे रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. तो मनोरुग्ण नसून महिन्यापूर्वी महाराष्ट्रात नोकरी शोधण्यासाठी आला होता. मात्र, त्याला नोकरी न मिळाल्याने तो फिरत होता. त्यातूनच तो पोलवर चढला. याचदरम्यान त्याला लोकलमधून येजा करणारे ओरडू लागले. त्यातून कोणीतरी मारेल, या भीतीने तो पोलवर आणखी वर चढल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंगल हा बुधवारी सायंकाळी अचानक पोलवर चढल्याने रेल्वे प्रशासनाची चांगली दमछाक झाली. दरम्यान, त्याला कोणतीही जखम होऊ नये, यासाठी रेल्वे प्रशासनाने तातडीने विद्युतपुरवठा बंद केल्यावर त्याला ठामपा अग्निशमन दलाच्या जवानांनी खाली उतरवले. तोपर्यंत अर्धा तास झाला होता. त्यानंतर, रेल्वेसेवा सुरू करण्यात आली. याप्रकरणी ठाणे रेल्वे आरपीएफ दलाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

वैद्यकीय तपासणीत तो कोणताच रुग्ण नसल्याचे स्पष्ट
ठाणे लोहमार्ग पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी करून त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर तो मनोरुग्ण असल्याचे कोणतेही प्रमाणपत्र डॉक्टरांनी दिले नाही. तसेच तो आपले नाव आणि पत्ता व्यवस्थित सांगत असल्याने तो मनोरुग्ण नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर, त्याला लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी रात्री रेल्वे सुरक्षा बल पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्याविरोधात भारतीय रेल्वे क ायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Youth who stops local service is not Psychiatric

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.