झेडपीत दीड कोटीचा घपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:07 PM2018-11-01T23:07:37+5:302018-11-01T23:08:09+5:30

निकृष्ट बारकोड यंत्रणेची पाचपट दराने खरेदी, आता पडली धूळखात

Zadpiite 1.5 crore scam | झेडपीत दीड कोटीचा घपला

झेडपीत दीड कोटीचा घपला

Next

- हितेन नाईक।

पालघर : या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांच्या नोंदणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या पेपरलेस बारकोड साहित्याची बाजारभावापेक्षा पाचपट दराने खरेदी करून सुमारे दीड कोटींचा भ्रष्टाचार झाला असून हे साहित्य सध्या धूळखात पडून असतांना तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी आणि कॅफो यांनी त्याचा दर्जा चांगला असल्याचे सर्टीफिकेट ही देऊन टाकले आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा कडून ४५ प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांच्या नोंदणीसाठी पेपरलेस बारकोड कार्ड अ‍ॅन्ड टोकन सिस्टीम, लॅमिनेशन मशीन, पाऊच, पेपर रोल, टेबल टॉप स्कॅनर, बारकोड स्कॅनर, बारकोड प्रिंटर आदी साहित्य खरेदी करून कार्यान्वित करण्यासाठी उपसंचालक आरोग्यसेवा मुंबई मंडळ, ठाणे यांच्याकडून ई - निविदा प्रक्रि या राबवली होती. त्यानुसार नुओव्ही फार्मास्युटिकल, घाटकोपर ह्या निविदाधारकास प्रति मशीन व सोबतच्या साहित्यसाठी सुमारे ३ लाख २९ हजार ३१३ रु पये इतक्या खर्चाच्या निविदेस मंजुरी देऊन एकूण १ कोटी ४८ लाख १९ हजार ८५ रुपयांच्या साहित्याची खरेदी करण्यात आली.

या साहित्याचे वाटप १२ मार्च २०१७ रोजी करण्यात आले. जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात ३ प्राथमिक आरोग्य केंद्र, मोखाडा ४, विक्रमगड ३, डहाणू ९, वाडा ४, वसई ८, पालघर १० आणि तलासरी ४ अशा एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्राला वरील पेपरलेस बारकोड मशीन व इतर साहित्य १२ मार्च २०१७ ला मिळाल्याचे संबंधित वैद्यकीय अधिकाºयाने कळविले आहे. परंतु हे बारकोड मशीन पुरवठा करून १ वर्ष ७ महिन्याचा कालावधी उलटून गेल्या नंतरही हे सर्व साहित्य आजही धूळखात पडून आहेत.

जिल्हापरिषदेच्या बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत गैरव्यवहारा सोबत पेपरलेस बारकोड खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा मुद्दा माजी उपाध्यक्ष सचिन पाटील ह्यांनी उपस्थित करून तिसºया भ्रष्टाचाराचे प्रकरण उचलून धरले. यापूर्वी त्यांनी अनुकंपा आणि शिपाई भरती गैरव्यवहाराची प्रकरणे बाहेर काढली होती. पेपरलेस बारकोड मशीन खरेदी प्रकरणातील साहित्याची अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करण्यात आली असून आजच्या बाजारातील मूळ किमती पेक्षा पाच पट रक्कम फुगवून लावण्यात आल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. मूळ मशीन सह अन्य सहा वस्तूंचे वेगवेगळे दर नमूद करण्या ऐवजी सातही वस्तूंची एकच ३ लाख २९ हजार ३१३ रुपये किंमत ठेकेदाराने लावून हेतू पुरस्सर आपले इप्सित साध्य करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. जिल्हा नियोजनातून हा कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात आला असून जिल्ह्यातील एकाही प्राथमिक आरोग्य केंद्रातून पेपरलेस बारकोडचे कामकाज सुरू झालेले नसतांना ह्या मशीनचा दर्जा उत्तम असल्याचे प्रमाणपत्र जिप चे मुख्य लेखा व वित्त अधिकारी (कॅफो) संजय पतंगे व तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष गायकवाड यांनी देऊन टाकल्याने ठेकेदाराला सर्व रक्कम अदाही करण्यात आलेली आहे.

पूर्वतयारी नसतानाच महागडी केली खरेदी
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे ह्यांनी स्वत: पालघर, तलासरी आणि डहाणू ह्या तीन तालुक्यातील काही आरोग्य केंद्राना भेटी दिल्या असता पेपरलेस मशिनचे काम सुरू नसल्याचे त्यांना आढळून आले आहे.
त्यामुळे कोणतीही प्राथमिक पूर्व तयारी न करता, घिसाडघाई करून खुल्या बाजार भावाची कुठलीही शहानिशा न करता चढ्याभावाने हे साहित्य खरेदी केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
आजवर उघडकीस आलेल्या घोटाळ्यांवर कारवाई झालेली आहे. त्यामुळे आता या घपल्याची चौकशी होते व तिच्यावर कोणती कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

हे गंभीर प्रकरण असून हव्या त्या दराने पुरवठा करण्यात आला नसल्याने मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी ह्याची गंभीर दखल घ्यावी असे 
पत्र दिले आहे. 
-विजय खरपडे, अध्यक्ष, जिप

ह्या खरेदीत मोठा गैरव्यवहार झाला असून उच्चस्तरीय चौकशी व्हावी.
- सचिन पाटील, माजी उपाध्यक्ष

Web Title: Zadpiite 1.5 crore scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.