कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य उपयोग, लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2020 11:57 PM2020-07-12T23:57:37+5:302020-07-12T23:58:49+5:30

लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाºयांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असतानाही शहरातील व्यापारी प्रशासनाला सातत्याने सहकार्य करीत आहेत.

Zero use to gain control over the corona | कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य उपयोग, लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना

कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य उपयोग, लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाऱ्यांना

Next

- पंकज पाटील 

अंबरनाथ : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यापासून शहरातील व्यापाऱ्यांची मोठी कोंडी झाली आहे. शहरात कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. मात्र या निर्णयाचा कोणताही फायदा कोरोनाची संख्या कमी करण्यासाठी झालेला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान करून जे लॉकडाऊन राबविण्यात आले त्याचा कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शून्य उपयोग झाला हेच समोर आले आहे. लॉकडाऊनचा फटका शहरातील व्यापाºयांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. असे असतानाही शहरातील व्यापारी प्रशासनाला सातत्याने सहकार्य करीत आहेत. मात्र लॉकडाऊन जाहीर झाल्यावर रस्त्यांवर कोणीच दिसणार नाही याची काळजी घेणे गरजेचे होते.
मात्र गेल्या तीन आठवड्यात प्रशासनामार्फत कडक लॉकडाऊन राबवण्यासाठी कोणतीच ठोस उपाययोजना राबवली गेली नाही. केवळ दुकाने बंद ठेवून प्रशासन लॉकडाऊनचे यश शोधण्याच्या मागे लागले आहे.
शहरातील रिक्षा आणि दुचाकीस्वार रस्त्यावर भटकत आहेत. नागरिकही विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमुळे शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कितपत यश येईल याची शाश्वती खुद्द प्रशासनही देऊ शकत नाही. शहरात लॉक डाऊन शिथिल झाल्यावर व्यापाºयांना एक दिवसाआड दुकान उघडण्याची परवानगी दिली होती. मात्र त्याच काळात कोरोनाचा प्रभाव वाढल्याने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केले. असे असूनही रुग्णांच्या संख्येत वाढच झालेली आहे.

शहराच्या हिताच्या दृष्टीने आम्ही प्रशासनाला प्रत्येकवेळी मदत केली आहे. आता प्रशासनाने व्यापाºयांच्या हिताचाही विचार करावा. शहरात व्यापाºयांना योग्य अटी आणि नियम घालून व्यवसाय करण्याची संधी द्यावी एवढीच माफक अपेक्षा आहे. २२ मार्चपासून ते १२ जुलैपर्यंत मोजक्या दिवसांत व्यापाºयांना व्यवसाय करण्याची संधी मिळाली. त्यामुळे आता व्यापारी आपला तोटा किती सहन करणार, याचाही विचार करण्याची गरज आहे.
- खानजी धल, अध्यक्ष,
अंबरनाथ व्यापारी संघ

Web Title: Zero use to gain control over the corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे