लम्पीमुळे ठाणे जिल्ह्यात जनावरे दगावली नसल्याचा जिल्हापरिषदेचा दावा! 

By सुरेश लोखंडे | Published: September 17, 2022 04:38 PM2022-09-17T16:38:32+5:302022-09-17T16:42:52+5:30

जनावरांच्या शर्यती व प्रदर्शन बंद करण्यात आले आहेत.

zilla parishad claims that no animals died in thane district due to lumpy | लम्पीमुळे ठाणे जिल्ह्यात जनावरे दगावली नसल्याचा जिल्हापरिषदेचा दावा! 

लम्पीमुळे ठाणे जिल्ह्यात जनावरे दगावली नसल्याचा जिल्हापरिषदेचा दावा! 

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : लम्पी आजार जनावरांपासून माणसांना होण्याची शक्यता अजिबात नसून, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने मनुष्यांला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. िजल्ह्यातील जनावरांमध्ये लम्पीची लक्षण िदसत आहेत. मात्र एकही जनावर या आजाराने जिल्ह्यात आजपर्यंत दगावले नाही. जनावरांना लंपी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास, लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी या १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी केले आहे.

येथील जिल्हा पिरषदेच्या माध्यमातून सातपुते यांनी पत्रकार पिरषद घेऊन प्रशासन सज्ज असल्याचा दावा करण्यात आला आहे. यावेळी पशुसंवर्धन उप आयुक्त प्रशांत कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी समीर तोंडणकर उपस्थित होते. राज्यासह िजल्ह्यातही जनावरांवरील लम्पी त्वचा रोग या आजाराचा शिरकाव झाला आहे. ठाणे जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमध्ये गुरांचा बाजार बंद करण्यात आला. जनावरांच्या शर्यती व प्रदर्शन बंद करण्यात आले आहेत.

शहापूर, भिवंडी, अंबरनाथ या तीन तालुक्यांमध्ये लंपी रोगाचे १६ केंद्र बिंदू असून आतापर्यंत एकूण ४३ जनावरे बाधित झालेली आढळून आलेली आहेत. लम्पी त्वचा रोगामुळे पशुपालकांनी घाबरू नये, असाही धीर सातपुत ेयांनी िदला आहे. जिल्ह्यात ५ शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. बाधित जनावरांच्या पाच किलोमीटर परिघातील १० हजार ५७७ जनावरे आहेत. यापैकी आठ हजार ४५० जनावरांना लसीकरण पूर्ण झाले आहे.

Web Title: zilla parishad claims that no animals died in thane district due to lumpy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.