जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लाक्षणिक संपासह उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:00 AM2019-08-10T00:00:19+5:302019-08-10T00:00:33+5:30
प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेची मागणी : शासनाविरोधात घोषणा
ठाणे : जिल्हा परिषदेतील काही संघटनांच्या नेतृत्वाखाली लिपिक व लेखासंवर्ग कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी एकत्र येऊन प्रलंबित विविध मागण्यांसाठी उपोषण व एक दिवसाचा लाक्षणिक संप केला.
या एकदिवसीय लाक्षणिक संपात महाराष्टÑ राज्य जिल्हा परिषद कर्मचारी संघटना समन्वय कृती समिती, लेखा कर्मचारी संघटना, जि.प. कर्मचारी युनियन, औषध निर्माण अधिकारी संघटना, कास्ट्राइब संघटना आदी संघटनांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेचे बहुतांशी लिपिक व लेखा संवर्ग कर्मचाºयांनी हा एकदिवसीय लाक्षणिक संप केला. एवढेच नव्हे तर प्रलंबित विविध मागण्यांसाठी कर्मचाºयांनी जिल्हा परिषदेच्या आवारात बसून उपोषणही केले आहे. प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी यावेळी कर्मचाºयांनी घोषणाबाजी करून उपस्थितांना मार्गदर्शन केले आहे.
लिपिक, लेखा, परिचर, वाहनचालक, आरोग्य कर्मचारी आदी संवर्गाच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करण्यात यावी, समान वेतन, समान काम या तत्त्वानुसार समान फायदे तत्त्व लागू करून २००५ ला लागलेल्या कर्मचाºयांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी व करार पद्धतीने केलेल्या नेमणुका प्रथम दिवसापासून कायम करणे, आरोग्य विभागात खाजगीकरणाच्या माध्यमातून योजना लागू केल्या असून त्या त्वरित बंद करणे, पाच दिवसांचा आठवडा लागू करणे आदी मागण्यांसाठी कर्मचाºयांनी लाक्षणिक संपासह उपोषणाद्वारे शासनाचे लक्ष वेधले आहे.