जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांची देयके प्रलंबित; निवडणूक खर्चासह दीड कोटींची थकबाकी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2019 12:44 AM2019-12-03T00:44:08+5:302019-12-03T00:44:18+5:30
निवडणूक खर्च व मानधन असे दीड कोटींच्या आसपास रक्कम थकीत आहे.
ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका होऊन दोन वर्षांचा काळ उलटला, तरी या निवडणुकीत जिल्हा व तालुकास्तरावर प्रत्यक्ष काम करणाºया अधिकारी व कर्मचाऱ्यांना अद्यापही पारश्रमिक मानधन व अतिकालिकभत्ता अद्यापही मिळाला नसल्याने कर्मचाºयांमधून नाराजीचा सूर उमटू लागला आहे. तो मिळावा यासाठी शासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने देण्यात आली. निवडणूक खर्च व मानधन असे दीड कोटींच्या आसपास रक्कम थकीत आहे.
निवडणुका म्हटल्या की, उमेदवारांसह प्रशासकीय यंत्रणा कामास लागते. दोन्ही घटकांकडून निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असते. निवडणुकीच्या माध्यमातून शासकीय अधिकारी व कर्मचाºयांवर अतिरिक्त कामाचा बोजा पडत असतो. आचारसंहिता लागू झाल्यानंतर प्रशासकीय पातळीवर निवडणुकीच्या कामास सुरु वात होत असते. मतदानाच्या आधी, मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणी काळात निवडणूक अधिकारी व कर्मचाºयांवर जबाबदारी सोपविली जाते. मतदान सुरळीत पार पडावे, यासाठी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, मतदान केंद्रांवर नियुक्त सुरक्षा कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी, फिरते पथक, आयकर निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षक यांच्यावर धुरा सोपविली जाते. संबंधित अधिकारी व कर्मचाºयांना प्रशिक्षण, मतदानाच्या आधी साहित्यवाटप, मतदान दिवस, त्या दिवशी भोजनभत्ता अशा टप्प्यांत पैसे दिले जातात. मात्र, ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका पार पडून अधिकारी, कर्मचाºयांना पारिश्रमिक मानधन व अतिकालिकभत्ता अद्यापही मिळाला नसल्याची बाब समोर आली.
दरम्यान, ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जिल्हा व तालुकास्तरावर प्रत्यक्ष काम करणाºया अधिकारी व कर्मचाºयांना पारिश्रमिक मानधन व अतिकालिकभत्ता असे एक कोटी १७ लाख ८१ हजार ८७ रुपये अद्याप शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले नाहीत. तर, निवडणुकीच्या वेळी लागणाºया साहित्य व वाहनांवरील खर्च, प्रशिक्षणावरील खर्च एकूण ३० लाख ११ हजार ४२८ अशी एकूण एक कोटी ४७ लाख ९२ हजार ५०६ एवढे देणी शिल्लक आहे.