जिल्हा परिषदेचा यंदाचा १२४  कोटी ५९ लाख अर्थ संकल्प सादर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 09:06 PM2020-07-06T21:06:36+5:302020-07-06T21:14:52+5:30

शासन आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी सन २०१९ -२० चा सुधारित आणि सन २०२०-२१ च्या मूळ अंदाजपत्रकास मान्यता दिली होती.

Zilla Parishad's 124 crore 59 lakh budget resolution presented this year | जिल्हा परिषदेचा यंदाचा १२४  कोटी ५९ लाख अर्थ संकल्प सादर 

जिल्हा परिषदेचा यंदाचा १२४  कोटी ५९ लाख अर्थ संकल्प सादर 

Next
ठळक मुद्देया अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन, शिक्षण, बांधकाम, पाटबंधारे, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषि, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बाल विकास, ग्रामपंचायत, अपंग कल्याण आदी विभागांना विविध योजनासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.

ठाणे : कोरोनामुळे रखडलेला ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०१९ -२० चा सुधारित आणि यंदाचा म्हणजे  २०२०-२१ या वर्षाचा १२४ कोटी ५६ लाख ५२ हजार ६०० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष तथा अर्थ समिती सभापती सुभाष पवार यांनी सादर केला. यासाठी ही सभा ऑनलाइन घेण्यात आली.  

जिल्हा परिषदेच्या या अध्यक्षा, उपाध्यक्षांचे खांदे पालट 15 जुलैरोजी होत आहे. तत्पूर्वी त्यांच्या कार्यकालातील हा अर्थसंकल्प घाईघाईत सादर करुन घेतल्याचे ऐकायला मिळत आहे. या मूळ अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या निरनिराळ्या विभागांकडील सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजना प्रामुख्याने घेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या उपस्थित हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. 

शासन आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी सन २०१९ -२० चा सुधारित आणि सन २०२०-२१ च्या मूळ अंदाजपत्रकास मान्यता दिली होती. त्यामुळे आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सुधारित आणि मूळ अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मुख्य लेखा व वित्त अधिकारी गीता नागर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  छाया शिसोदे उपस्थित होत्या.   

या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन, शिक्षण, बांधकाम, पाटबंधारे, आरोग्य विभाग, ग्रामीण पाणी पुरवठा, कृषि, पशुसंवर्धन, समाजकल्याण, महिला व बाल विकास, ग्रामपंचायत, अपंग कल्याण आदी विभागांना विविध योजनासाठी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. शिवाय नवीन पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो. तथापि, देखभाल दुरुस्तीसाठी अत्यल्प प्रमाणात निधी उपलब्ध होतो, हे विचारात घेऊन देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषद अर्थसंकल्पात स्वतंत्ररित्या भरीव तरतूद करण्यात आली आहे. जेणेकरून पाणीपुरवठ्याच्या नादुरुस्त किंवा बंद योजना सुरू करून ग्रामीण भागात सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होईल.  

 *अर्थसंकल्पात नवीन योजनांचा समावेश
 *प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुरक्षा रक्षक, सफाई कामगार नेमणे 
 *५० टक्के अनुदानावर शेळी, संकरित गायीं /म्हैस वाटप, भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण करणे, 
 * पिक संरक्षणाकरीता काटेरी तार, विद्युत कुंपनासाठी एक री दहा हजार किंवा प्रत्येक्ष खर्चाच्या ७५ टक्के कमी असेल 
* शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढीसाठी फुलशेतीला प्रोत्साहनपर अनुदान प्रती १० गुंठे  १० हजार रुपये देणे 
 * मागासवर्गीय वस्तीतील समाज मंदिरामध्ये सतरंजी पुरविणे,  विद्यार्थाना एमएससीआयटी संगणक/टंकलेखन प्रशिक्षण 
  *नवीन विंधन विहीर खोदाई, हात पंप उभारणी व कट्टे बांधणे

आणखी बातम्या...

अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता

"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील"

चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत

Web Title: Zilla Parishad's 124 crore 59 lakh budget resolution presented this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे