जि.प. अध्यक्ष १५, तर सभापती निवड ८ जानेवारीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 03:00 AM2017-12-30T03:00:03+5:302017-12-30T03:00:12+5:30

ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्षपदांची निवड १५ जानेवारीला तर पाच पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतींची निवड ८ जानेवारीला होणार आहे.

Zip Chairman 15, while the selection of the chairperson will be on January 8 | जि.प. अध्यक्ष १५, तर सभापती निवड ८ जानेवारीला

जि.प. अध्यक्ष १५, तर सभापती निवड ८ जानेवारीला

Next

ठाणे : ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष-उपाध्यक्षपदांची निवड १५ जानेवारीला तर पाच पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापतींची निवड ८ जानेवारीला होणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी उपविभागीय अधिकाºयांवर जबाबदारी टाकली आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निवडीचा कार्यक्रम वर्तक सभागृहात होणे अपेक्षित होते. पण, सभागृह नादुरुस्त असल्यामुळे जिल्हा नियोजन भवनात हा कार्यक्रम पार पडणार आहे. पसंतीच्या उमेदवारास हात वर करून पाठिंबा द्यावा लागणार आहे. या निवडीचे व्हिडीओ चित्रीकरणदेखील केले जाणार आहे. यासाठीचा उमेदवारी अर्जही त्याच दिवशी सभागृहात भरावा लागणार आहे. त्यानंतर छाननी, उमेदवारी मागे घेणे आणि त्यानंतर आवश्यकता असल्यास हात वर करून मतदान प्रक्रिया एकाच दिवशी सभागृहात पार पडणार आहे. जिल्हा परिषदेच्या या पहिल्या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून ठाणे येथील उपविभागीय अधिकारी सुदाम परदेशी जबाबदारी पार पाडणार आहेत.
>पाच पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सदस्य असल्याने, पहिल्या सभेस त्यांची उपस्थिती आवश्यक असल्याने त्यांची निवड आठवडाभर आधी होईल. शहापूर, कल्याण, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथचे तहसीलदार त्यात्या तालुक्यातील पंचायत समितीच्या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

Web Title: Zip Chairman 15, while the selection of the chairperson will be on January 8

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे