येत्या गुरूवारी ठाण्यातील गावदेवी मैदानात शून्य सावली शो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 03:53 PM2018-05-13T15:53:23+5:302018-05-13T15:53:23+5:30

ठाण्यात विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण व्हावे यासाठी पहिल्यांदाच शून्य सावली शो आयोजित करण्यात आला आहे.

Zoo Shadow Show in Gawdevi ground in Thane on Thursday | येत्या गुरूवारी ठाण्यातील गावदेवी मैदानात शून्य सावली शो

येत्या गुरूवारी ठाण्यातील गावदेवी मैदानात शून्य सावली शो

Next
ठळक मुद्देयेत्या गुरूवारी ठाण्यातील गावदेवी मैदानात शून्य सावली शोशून्य सावली दिवसाचे महत्व प्रात्यिक्षकासह सांगणार जनमानसात विज्ञानाविषयी कुतूहल जागृत करणे हा उद्देश - सोमण

ठाणे: मराठी विज्ञान परिषद ठाणे विभाग आणि विश्वास सामाजिक संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानेगुरु वार १७ मे रोजी दुपारी ठीक १२ वाजता ठाण्यातील गावदेवी मैदानात ‘शून्य सावली शो’ आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण शून्य सावली दिवसाचे महत्व प्रात्यिक्षकासह सांगणार आहेत तरी सर्व विज्ञानप्रेमी लोकांनी वेळेवर हजर राहून याचा लाभ घ्यावा असे आवाहन नगरसेवक संजय वाघुले यांनी केले आहे.
     ठाण्यात प्रथमच अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. जनमानसात विज्ञानाविषयी कुतूहल जागृत करणे हा उद्देश असल्याचे सोमण यांनी सांगितले. यात शून्य सावली म्हणजे काय, शुन्य सावली कशी होते याची माहिती देत उपस्थितांना वर्तळाकार उभे करुन प्रात्यक्षिक दाखविणार आहे. सूर्य नेहमी डोक्यावर येत नाही तो वर्षातून दोनदा डोक्यावर का येतो याचे उत्तर ठाणेकरांना येत्या गुरूवारी मिळणार आहे. सूर्याचा जन्म कसा झाला, त्याचा मृत्यू कधी होणार आहे याची माहिती यादिवशी दिली जाणार असल्याचे सोमण यांनी सांगितले. यावेळी उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले जाईल. विज्ञानप्रेमींनी आपले प्रश्न लिहून आणावे असे आवाहन देखील आयोजकांनी केले आहे. संकटकाळी सावलीही आपली साथ देत नाही असं म्हटलं जातं. परंतू १७ मे रोजी संकट नसतानाही ठाणेकरांची सावली साथ सोडणार आहे. येत्या गुरूवारी ठाणे, डोंबिवली, कल्याण येथे शुन्य सावलीचा दिवस असणार आहे. या दिवशी मधून दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी उन्हात उभे राहिल्यास आपली सावली पायाखाली आल्याने दिसणार नाही याचे प्रात्यक्षिक ठाणेकरांना पाहायला मिळेल. ज्या दिवशी सूर्याची क्रांती आपल्या गावच्या अक्षांशाएव्हढी होते त्या दिवशी दुपारी सूर्य आपल्या डोक्यावर आल्याने आपली सावली आपल्या पायाखाली आल्याने सावली अदृश्य होते. या दिवसाला ‘शून्य सावलीचा दिवस ‘ असे म्हणतात. यावर्षी ८ मे- सिंधुदुर्ग, कणकवली, देवगड, राजापूर, १० मे कोल्हापूर , मिरज सांगली, ११ मे रत्नागिरी, १२ मे सातारा - सोलापूर,  १३ मे उस्मानाबाद, १४ मे रायगड, पुणे, लातूर, १५ मे अंबेजोगई, १६ मे मुंबई, नगर, परभणी नांदेड, १७ मे ठाणे डोंबिवली, कल्याण, पैठण. १९ मे औरंगाबाद बीड, जालना, चंद्रपूर. २० मे नाशिक, वाशीम गढचिरोली २१ मे बुलढाणा , यवतमाळ २२ मे वर्धा २३ मे धुळे, २४ मे भुसावळ जळगांव या ठिकाणांवरून त्या त्या दिवशी अनुभव घेता येणार असल्याचे सोमण म्हणाले. 

Web Title: Zoo Shadow Show in Gawdevi ground in Thane on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.