मनोहर पर्रीकर FOLLOW Manohar parrikar, Latest Marathi News मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर म्हणजेच मनोहर पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे नेते होते. पर्रीकरांनी 2000 ते 2005, 2012 ते 2014, 14 मार्च 2017 ते 17 मार्च 2019 असे तीन वेळा गोवा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. मनोहर पर्रीकर यांचा जन्म म्हापसा येथे 13 डिसेंबर 1955 रोजी झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण मडगावच्या लॉयला हायस्कूल येथे झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षण मराठीतून घेतले. नंतर भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई येथून त्यांनी इ.स. 1978 साली धातुशास्त्रात अभियांत्रिकीची पदवी घेतली. आयआयटीची पदवी असलेले ते पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. मनोहर पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. वयाच्या 63 व्या वर्षी पर्रीकर यांनी अखेरचा श्वास घेतला. Read More
गोव्यात भाजपाकडे स्वत:चे फक्त चौदा आमदार असून त्यापैकी तीन आजारी आहेत. अशास्थितीत मुख्यमंत्रीपदावरील नेता बदलला तर सत्ताधारी आघाडीचे घटक पक्ष नाराज होतील व सरकार कोसळेल याची कल्पना गेल्या चोवीस तासांत भाजपामधील अनेक जाणकारांना आली आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना नेमका कोणता आजार झाला आहे, याची अधिकृत माहिती सरकारनं 24 तासांच्या आता जाहीर करावी आणि मुख्यमंत्रिपदाचाही त्याग करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेसनं केली आहे. ...
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अनुपस्थितीत गोव्याचे प्रशासन सक्रिय करण्याच्या हेतूने गोवा सरकारमध्ये नेतृत्व बदल केला जाण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासह गोवा भाजपची कोअर टीम गरुवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची ...
मुंबईमधील लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारी (29 ऑगस्ट) संध्याकाळी पुढील उपचारांसाठी अमेरिकेत जाणार आहेत. ...
येत्या लोकसभा निवडणुकीनिमित्ताने गोव्यात काँग्रेस पक्ष संघटना अधिक सक्रिय व्हावी म्हणून गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी प्रयत्न सुरू केला आहे. ...
मुंबईच्या इस्पितळात उपचार घेत असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर बुधवारपर्यंत गोव्यात दाखल होणार आहेत. मुख्यमंत्र्यांची स्थिती आता सुधारली आहे. मुंबईच्या लिलावती इस्पितळात मुख्यमंत्री दाखल झाले होते. ...
मुंबई येथील लिलावती रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे. ...
गोव्याचे प्रशासन पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवल्यासारखे झाले आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर 11 दिवस अमेरिकेत उपचारांसाठी राहून बुधवारी परतले व लगेच गुरुवारी दुपारी वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने मुंबईला रवाना झाले. ...