केंद्र सरकारने तिन्ही दलातील सैनिकांच्या भरतीसाठी नव्या अग्निपथ योजनेची Agneepath Scheme घोषणा केली आहे. वाढता वेतन आणि पेन्शन खर्च कमी करून, या योजनेअंतर्गत अल्प काळासाठी सैनिकांची भरती करण्यात येणार आहे. या योजनेला उत्तर भारतातील सर्व राज्यांमधून तीव्र विरोध होत असून रेल्वे जाळपोळ, दगडफेक, रास्ता रोको अशा प्रकारचं हिंसक आंदोलन बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा या राज्यांमध्ये सुरू आहे.