Amritpal Singh आपल्या एका साथीदाराला सोडवण्यासाठी अमृतपाल सिंग याच्या समर्थकांनी काही आठवड्यांपूर्वी पंजाबच्या अजनाला पोलीस स्टेशनला घेराव घातला होता. त्यानंतर, अमृतपाल सिंग चर्चेत आला. अमृतपाल सिंग हा अमृतसर जिल्ह्यातल्या जल्लापूर खेरा गावचा रहिवासी असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्याचं वय 30 वर्षे आहे. अमृतपालनं पंजाबच्या एका विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगचं शिक्षण घेतलं आहे आणि त्यानं एका कार्गो कंपनीत ऑपरेशनल मॅनेजर म्हणून काम केलं होतं. अमृतपाल सिंग खलिस्तानी चळवळीचा समर्थक असून वारिस पंजाब दे ही त्याची संघटना आहे. दरम्यान, 2020-21 साली दिल्ली परिसरात झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान त्याची लोकप्रियता आणखी वाढली. Read More
Amritpal Singh : सूत्रांनी सांगितले की, अमृतपाल सिंगला जम्मू-काश्मीरमार्गे पाकिस्तानातून आधुनिक शस्त्रांची मोठी खेप पाठवण्यात आली होती. त्याने पाकिस्तानातून ६ एके ४७ आणि २ एके ५६ मागवल्या होत्या. ...