अनुप सोनीने आजवर अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याचे बालिकावधू या मालिकेतील काम प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. आता क्राईम पेट्रोल या कार्यक्रमात तो परतणार आहे. अनुप हा मुळचा पंजाबचा असून त्याने नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत. एनएसडीमधून बाहेर पडल्यानंतर त्याने सी हॉक्स, साया यांसारख्या मालिकांमध्ये काम केले. या मालिकांमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. Read More