Assam assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा - २७ मार्च रोजी असून दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, तिसरा टप्प्यात ६ एप्रिल मतदान असून 2 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. Read More
West Bengal, Assam, Kerala, Tamilnadu Exit Poll 2021: टाइम्स नाऊ सी वोटर सर्व्हेनुसार याठिकाणी भाजपा टीएमसीला कडवी झुंज देत आहे. परंतु एक्झिट पोलनुसार सरकार बनवण्यासाठी भाजपाला वाट पाहावी लागेल. ...