Assam assembly elections 2021, Latest Marathi News
देशात होणाऱ्या आगामी 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यात पुदूचेरी; आसाम ;पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या 5 राज्यांच्या विधानसभांचा निवडणूक कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानुसार, आसाममध्ये 3 टप्प्यात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा - २७ मार्च रोजी असून दुसऱ्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान होत आहे. तर, तिसरा टप्प्यात ६ एप्रिल मतदान असून 2 मे रोजी या निवडणुकांचा निकाल लागणार आहे. येथील निवडणुकांसाठी भाजपा, काँग्रेस आणि संबंधित राज्यातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केलीय. त्यासंदर्भात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. कोरोना नियमावलींचे पालन करुनच या निवडणुका पार पाडाव्या लागणार आहेत. Read More
भाजपा नेत्याच्या गाडीत ईव्हीएम मशिन आढळून आल्यानंतर काँग्रेससह भाजपा विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेऊन निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उभा केले होते. ...
Assam Assembly Elections 2021 :आसाममध्ये गुरुवारी दुसऱ्या टप्प्यातील 39 जागांसाठी मतदान घेण्यात आले. या दिवसभरातील मतदान प्रकियेनंतर भाजपा उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम मशिन आढळून आल्याची घटना उघडकीस आली आहे ...
आसाम विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यात विविध यंत्रणांनी रोख रक्कम, दारू, अंमली पदार्थ साहित्य जप्त केले असून, त्याची किंमत ११० कोटी रुपये आहे, आसामचे मुख्य निवडणूक अधिकारी नितीन खाडे यांनी बुधवारी सांगितले. ...
Assam Assembly Elections 2021 : काँग्रेस पक्षाने नेहमीच आपली आश्वासने पाळली आहेत. राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर दिलेली आश्वासने पाळल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे, असे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी स्पष्ट केले. ...
Assam Assembly Elections 2021 News : आसामला पुन्हा घुसखोरांचा अड्डा बनू देणार नाही, असे स्पष्ट करतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांना कठोर शब्दात सांगितले की, गत पाच वर्षांत भाजपने अतिक्रमण केलेली ज ...
जाहिरात बातमीच्या स्वरुपात छापल्याप्रकरणी काँग्रेसने मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा , प्रदेशाध्यक्ष रंजीतकुमार दास यांच्यासह आठ वर्तमानपत्रांच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. ...