लेबनानची राजधानी बेरुत येथे भीषण स्फोट झाला असून 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. हा स्फोट त्याठिकाणी झाला जेथे मोठ्या प्रमाणात फटाके ठेवले होते असं स्थानिक वृत्तवाहिन्या सांगत आहेत. लेबनानमध्ये राहणाऱ्या आंचल वोहरा यांनी ट्विट करुन सांगितलं की, लेबनानमध्ये बॉम्बस्फोट झाला आहे. माझं घरही स्फोटात जळालं आहे. तर, तेथील सुरक्षा एजन्सीनेही या स्फोटाबद्दल माहिती देताना, फटाक्यांचा मोठा साठा असलेल्या ठिकाणी लागलेल्या आगीमुळे हा स्फोट झाल्याचं सांगितलं. Read More
ज्यावेळी स्फोट झाला होता त्याचवेळी जवळच्या एका हॉस्पिटलमध्ये एका बाळाचा जन्म झाला होता. स्फोटामुळे हॉस्पिटलचं छत आणि भींती तुटल्या होत्या. तेव्हाच जॉर्जचा जन्म झाला. ...
सोशल मीडियात या स्फोटाची दाहकता दाखवणारे अनेक व्हिडीओज आणि फोटोज लोकांनी शेअर केले आहेत. असाच एक व्हिडीओ शेअर करण्यात आलाय ज्यात एक महिला वेडिंग फोटोशूट करत होती आणि तिच्या मागे अचानक स्फोट झाला. ...