भारती पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय राज्यमंत्रिपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारती पवार या आधी राष्ट्रवादीमध्ये होत्या. नंतर त्या भाजपात आल्या. तब्बल ८ वेळा आमदार आणि शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जाणारे नेते ए. टी. पवार यांच्या त्या स्नुषा (सून) आहेत. भारती पवार यांनी 2019 मध्ये भाजपात प्रवेश केला. त्या दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार आहेत. Read More
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या आदिवासी राखीव असलेल्या लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच महिला खासदार म्हणून निवडून आलेल्या डॉ. भारती पवार यांचा नुकताच केंद्रीय मंत्रिमंडळात सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा झाला. ...
दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांची थेट केंद्रीय मंत्रिमंडळात राज्यमंत्रिपदी व त्यातल्या त्यात त्यांच्या आवडीच्या असलेल्या आरोग्य क्षेत्राची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आल्याने त्यांना समाधान आहे. ...