२१ जुलैच्या रात्रीपासून कोसळणारा पाऊस, समुद्राला आलेलं उधाण आणि कोयना धरणातून सुरू केलेला विसर्ग यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेडमध्ये 'न भुतो' महापूर आला आहे. जगबुडी, वशिष्ठी नदीने रौद्ररूप धारण केलं असून शहरं, गावं, बाजारपेठांमध्ये १० फुटांपर्यंत पाणी भरलंय. या पुरामुळे झालेलं नुकसान कोट्यवधींच्या घरात आहे.