नाशिक : शरणपूर रोडवरील राजीव गांधी भवनासमोरून कॅनडा कॉर्नरकडे मार्गस्थ होताना महिला कारचालकाचा ताबा सुटल्याने मारुती सेलेरिओ कारने (एम.एच.१५ ईपी ४१५१) कोलांटउड्या घेतल्या. दरम्यान, मोटारीची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार जबर जखमी झाला. सुदैवाने या ...
मनमाड : ३१ डिसेंबर २०२१ रोजी सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टीचे बेत आखले जात असतानाच शासनाकडून आलेल्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने रात्रीची जमावबंदी लागू केली आहे. त्यामुळे रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाचपेक्षा अधिक ना ...
नाशिक- महापालिकेच्या व्यापारी संकुलातील थकबाकीदार गाळ्यांचे आता ई-लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय महापालिकेच्या जागांवर जाहिरात फलकांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. ...
एकलहरे : सामनगाव शिवारात मोकाट श्वानांची संख्या वाढल्याने नागरिकात व विशेषत: महिला आणि लहान बालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे श्वान रात्रंदिवस पिकांमध्ये झुंडीने भटकत असल्याने अनेक शेतकऱ्यांच्या कोबी, फ्लॉवर, टमाटे, भेंडी या भाजीपाल्याच ...
नाशिक : शहर व परिसरामध्ये शुक्रवारी पहाटे साडेचार वाजेपासून पाऊस सुरू झाला. सकाळी ६ वाजेपर्यंत मध्यम सरींचा वर्षाव शहरात होता. मात्र ७ वाजेपासून हलक्या पावसाची रिपरिप सुरू झाली. शहरात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत ६ मिमी इतका पाऊस नोंदविला गेला. ...
नाशिक : शहर व परिसरात सोमवारी (दि.१०) सायंकाळी पावसाच्या मध्यम सरींचा वर्षाव झाला. दिवसभर ढगाळ हवामान असल्याने वातावरणात उकाडा जाणवत होता. संध्याकाळी साडेसहा वाजता काही मिनिटे सरी कोसळल्याने हलकासा दिलासा मिळाला. ...
नाशिक : शहर परिसरात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करून महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. ...