रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत दीपा कर्माकरनं प्रोदूनोव्हा वॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत प्रवेश करत इतिहास घडवला होता. 14.833 गुणांसह ऑलिम्पिक स्पर्धेच्या वॉल्ट प्रकाराच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिलीच भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरली होती. अंतिम फेरीत तिनं 15.066 गुणांची नोंद करत चौथे स्थान पटकावले, अवघ्या काही गुणांच्या फरकानं तिचं कांस्यपदक हुकलं होतं.