अभिनेते फारूख शेख यांनी चित्रपट, मालिका या दोन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. उमराव जान, साथ साथ, चष्मे बद्दूर, नूरी यांसारख्या चित्रपटांनी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली. फारुख यांच्या चमत्कार, जी मंत्रीजी यांसारख्या मालिका प्रचंड गाजल्या. तसेच जीना इसी का नाम है या कार्यक्रमाचे ते सूत्रसंचालन करत असत. विविध क्षेत्रातील मान्यवारांसोबत ते या कार्यक्रमात गप्पा मारत. त्यांचा मृत्यू 27 डिसेंबर 2013 ला हृदयविकाराच्या झटक्याने दुबईत झाला. Read More