माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मुंबईतल्या कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं. Read More
सन १९६१ ची गोष्ट असेल...मी रेल्वेत मुंबईच्या दादर स्टेशनवर कार्यरत होतो. अचानक बुलंद आवाज, डोक्यावर दाट व विखुरलेले केस, शरीरावर खादीचे कपडे, पायात चप्पल व डोळ्यांवर जाड्या फ्रेमचा चष्मा असलेल्या एका व्यक्तीने काही कार्यकर्त्यांसमवेत रेल्वे प्रशासनाव ...
जॉर्ज बहुधा ख्रिश्चन फादर झाले असते, पण ते शिक्षण घेताना, त्यात तथ्य नसल्याचे जाणवताच त्यांनी सेमिनरी सोडली. मुंबईत पी. डिमेलो यांनी त्यांची नाळ समाजवादी व कामगार चळवळीशी जोडली. अन्यथा जॉर्ज पत्रकारितेत दिसले असते. ...