माजी संरक्षणमंत्री जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर दिल्लीतील मॅक्स केअर रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला. जॉर्ज फर्नांडिस हे मुंबईतून पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. एकेकाळी ते मुंबईतील प्रभावी नेते होते. जॉर्ज फर्नांडिस यांनी पहिल्यांदा 1967मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. मुंबईतल्या कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केलं होतं. Read More
जॉर्ज फर्नांडिस यांनी आपल्या संघटनात्मक ताकदीच्या बळावर गोदी कामगार, रेल्वे कर्मचारी, महापालिका, बेस्ट व एसटी कर्मचारी यांच्याबरोबरच मुंबईतील फेरीवाले, रसवंतीगृहे, गुमास्ते, चित्रपटगृहे व हॉटेलांतील कामगार, टॅक्सीचालक अशा सर्व कष्टकऱ्यांचे नेतृत्व के ...
जॉर्ज फर्नांडिस हे अजब रसायन होते. आक्रमकपणा, धमक आणि धाडसीपणा हे त्यांचे विशेष गुण. ‘जायंट किलर’, ‘बंद सम्राट’, ‘संप सम्राट’ अशी विशेषणे त्यांना कायम लागलेली. ...
वयाच्या १९व्या वर्षी ते कामगारांचे नेते झाले. रात्री १२ ते पहाटे ४ या वेळेत हॉटेल कामगारांचे संघटन केले. त्यानंतर टॅक्सी व मग रेल्वे. त्यांच्या कर्तृत्वाला आकाशही ठेंगणे वाटू लागले. ...
देशातील कष्टकरी वर्गाच्या प्रगतीसाठी झटणारा, कामगार संघटनांचे नेतृत्व करीत असताना त्यांच्याबाबत आंतरिक चिंता असणारा, कामगारांचे जीवनमान उंचावण्याचा ध्यास घेऊन काम करणारा नेता अशीच जॉर्ज फर्नांडिस यांची ओळख सांगता येईल. ...
मुंबईला गिरगावातल्या बॉम्बे लेबर युनियनच्या कचेरीमध्ये दुसऱ्या मजल्यावर जॉर्ज फर्नांडिस यांची बसण्याची खोली आहे. खोलीबाहेर सतत वेगवेगळ्या पेशांचे अनेक कामगार हातात कागदपत्रे घेऊन आपल्या कुठल्यातरी गाऱ्हाण्यांची ‘जॉर्जसाब’जवळ दाद लावून घेण्यासाठी ओळीत ...
जॉर्ज फर्नांडिस कामगार चळवळीत सक्रिय असताना मी गिरणी कामगार होतो. बेस्ट कामगारांपासून सफाई कामगार, हॉटेल कामगारांचा त्यांनी उभारलेला लढा आजही विसरता येणार नाही. ...