मागील पंधरा-सोळा दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जुलै महिन्यापर्यंत कोरडेच असलेल्या सिंचन प्रकल्पात आता चांगलाच जलसाठा जमा झाला आहे. जिल्ह्यात अकरा मोठे सिंचन प्रकल्प आहेत. यातील आठ प्रकल्प शंभर टक्के भरून ओव्हरफ्लो झाले आहेत. ...
पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी तसेच घोडाझरीच्या नितळ, नैसर्गिक सौंदर्यांने डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरीची वाट चालू लागली आहेत. ...
घोडाझरी तलावाच्या सांडव्याखाली विखुरलेले दगड पर्यटकांना धोकादायक ठरत आहेत. संबंधित विभागाने हे दगड त्वरित उचलून पर्यटकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. ...
पूर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलाव आता ओव्हरफ्लोच्या टप्प्यात आला आहे. याकरिता आणखी पावसाची गरज आहे. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यास पर्यटकांची मोठी गर्दी वाढू शकते. ...
गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याचे बंद झालेले काम सुरू झाले आहे. शासनाकडून देयके अदा होत नसल्याच्या सबबीवरून याअगोदरच्या कंत्राटदार कंपन्यांनी काम बंद केले होते. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला ...
महाराष्ट्र शासनाने घोडाझरीला अभयारण्य म्हणून घोषित करून सीमाही निश्चित केल्या. मात्र या अभयारण्याची स्थिती 'जैसे थे' आहे. या संदर्भातील प्रक्रिया अद्यापही पुढे सरकली नाही. त्यामुळे आता वन्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...
तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान पेरजागड येथे महाप्रसादाचा स्वयंपाक करण्यास निर्बंध घालण्यात आल्याने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना याठिकाणी स्वयंपाक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. ...
शासनाने अखेर घोडाझरीला अभयारण्याचा दर्जा बहाल केला आहे. घोडाझरीतील नैसर्गिक साधन संपत्ती, वन्यप्राण्यांचा वावर आणि नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेता हे अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वोत्तम अभयारण्य ठरेल, असा विश्वास या भागात व्यक्त होत आहे. ...